Bandhkam Kamgar Yojna (योजना कोणत्या आहेत)
- नोंदणीनंतर बांधकाम कामगाराला स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी 5000 रुपये प्रतिवर्षी.
- बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30 हजार रुपये अनुदान
- कामगाराच्या पत्नीला 2 अपत्यासाठी, नैसर्गिक प्रसूतीसाठी 15 हजार रुपये.
- शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20 हजार रुपये अनुदान.
- इयत्ता 1 ली ते 7 वी – 2500 रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती तसेच 8 वी ते 10 वी करिता 5000 रुपये, 10 वी 12 वी 10,000 रुपये.
- पदविका अभ्यासक्रमासाठी 20,000 रुपये
- पदव्युत्तर शिक्षणासाठी 25,000 रुपये
- अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000 रुपये
- वैद्यकीय पदवीसाठी 1 लाख प्रतिवर्षी शिष्यवृत्ती.
- एमएस-सीआयटीचे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परिपूर्ती.
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 1 लाख रुपये, 18 वर्षाकरिता मुदत बंद ठेव योजना.
- कामगाराला व्यसन मुक्ती केंद्रांतर्गत 6 हजार रुपये
- कामगाराला अपंगत्व आल्यास 20 हजार रुपये
- मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी 10 हजार रुपये
- नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये (वारसास)
- कामावर मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये (वारसास)
- मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला प्रतिवर्षी 24 हजार रुपये 5 वर्षांसाठी
- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामगाराला 2 लाख रुपये
- घर खरेदीसाठी, बांधणीसाठी बँकेकडून गृहकर्जावर 6 % एवढे व्याजदर अनुदान
- कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- मोफत उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना
- 60 वर्षांनंतर महिना 5000 पेन्शन
- कामगारांना सुरक्षेसाठी (सेफ्टी (किट)
Bandhkam Kamgar Yojna
ऑनलाइन व प्रत्यक्ष नोंदणीसाठी कागदपत्रे
नोंदणी फॉर्म, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, शिधापत्रिका यांच्या सत्य प्रती लागतात. कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाचा कायापालट करणे कामगारांच्याच हाती आहे.