Atal Pension Yojana : 210 रुपयांचा हप्ता भरा अन् दरमहा 5 हजार पेन्शन मिळवा

Atal Pension Yojana : केंद्र शासनामार्फत अटल पेन्शन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वय वर्षे 18 ते 40 पर्यंतच्या नागरिक, सरकारी, निम सरकारी कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा. या योजनेमध्ये कमीत कमी दरमहा 42 रुपये व जास्तीत जास्त 210 रुपये हप्ता भरणे आवश्यक आहे. या योजनेतून वय वर्षे 60 नंतर दरमहा पेन्शन सुरू होते. या योजनेमध्ये दरमहा तिमाही, वार्षिक हप्ता जमा करु शकतात.

या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा राष्ट्रीयीकृत बँकांमधून सर्वांना मिळू शकतो. अशी असेल पेन्शन व हप्तादरमहा 1000 रुपयेपेन्शनसाठी दरमहा 42 रुपये हप्ता मृत्यूनंतर मिळणारी रक्कम एक लाख सात हजारदरमहा 2000 रुपयेपेन्शनसाठी 84 रुपये हप्ता, मृत्यूनंतर मिळणारी रक्कम तीन लाख चार हजारदरमहा 3000 रुपयेपेन्शनसाठी 126 रुपये हप्ता,

Atal Pension Yojana

मृत्यूनंतर मिळणारी रक्कम पाच लाख एक हजारदरमहा 4000 रुपयेपेन्शनसाठी 168 रुपये हप्ता, मृत्यूनंतर मिळणारी रक्कम सहा लाख सात हजारदरमहा 5000 रुपयेपेन्शनसाठी 210 रुपये हप्ता, मृत्यूनंतर मिळणारी रक्कम आठ लाख पाच हजार यासाठी शेतकरी बांधव आपणही सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी आपल्या जवळील राष्ट्रीयकृत बँक किंवापोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधावा.

1 thought on “Atal Pension Yojana : 210 रुपयांचा हप्ता भरा अन् दरमहा 5 हजार पेन्शन मिळवा”

Leave a comment