Agriculture Drone : आता शेतकरी करतील ड्रोननं फवारणी, खरेदीसाठी मिळतंय 80 टक्के अनुदान

Agriculture Drone : सध्याच्या काळात शेतकरी शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. वेळ, श्रम आणि पैशाची बचत करून ड्रोनच्या माध्यमातून शेती पिकांची फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय.ड्रोनच्या माध्यमातून एक एकर फवारणीसाठी केवळ सात मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच औषध, पाणी आणि मनुष्यबळाची बचत होतेय. त्यामुळे शेतकरी आता स्वत:चा ड्रोन खरेदी करू शकतात. त्यासाठी 40 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदानही मिळत आहे.

शेतीच्या वापरासाठी शासकीय अनुदानातून आपल्याला ड्रोन खरेदी (agriculture drone price) करता येऊ शकतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून ड्रोनसाठी अनुदान दिले जाते. गरुडा कंपनीच्या ड्रोनची किंमत आठ लाख 17 हजार असून 60 हजार रुपये ड्रोनच्या परवान्यासाठी खर्च येतो. त्यामुळे ड्रोन खरेदीसाठी एकूण नऊ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यावर सरकारी अनुदान मिळते, असे ड्रोन पायलट सतीश माकोडे सांगतात.

Agriculture Drone

शेतीसाठी ड्रोन खरेदी करायचे असल्यास 40 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. महिला बचत गटांसाठी 80 टक्के अनुदान दिले जाते. फार्मा प्रोड्युसर कंपनींना 75 टक्के अनुदान मिळते. तर बीएससी ऍग्रीच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना 40 टक्के सबसिडी दिली जाते. तर लोनवर ड्रोन घेण्यासाठी 90 टक्के पर्यंत कर्ज घेता येते, असेही माकोडे सांगतात.

ड्रोनच्या माध्यमातून कोणत्याही पिकावर फवारणी करता येते. तर ड्रोनसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने विशेष योजना देखील राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ड्रोन फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय,

1 thought on “Agriculture Drone : आता शेतकरी करतील ड्रोननं फवारणी, खरेदीसाठी मिळतंय 80 टक्के अनुदान”

Leave a Comment

Close Visit News