7/12 online

7/12 online : सातबारा उतारा ऑनलाइन डाउनलोड

मालमत्ता मालक digitalsatbara.mahabhumi.gov.in वरून डिजिटल सातबारा उतारा ऑनलाइन आणि 8-अ उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकतात. त्याचा वापर कायदेशीर पडताळणीसाठी देखील केला जाऊ शकतो.

7/12 online

कोणते कागदपत्र मिळतात

सातबारा

वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता. सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आणि आपला सातबारा उतारा आपण पाहू शकतो किंवा त्याची प्रत काढू शकतो.

आठ अ उतारा

या ऑनलाइन प्रक्रियेत तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव सांगायचे आहे. त्यानंतर पुरुष की महिला, राष्ट्रीयत्व, त्यानंतर आधार कार्डला जोडणी असलेल्या मोबाइल नंबर अचूकपणे मांडायचा आहे.

फेरफार उतारा

1982 मधील फेरफार पाहायचा असल्यास ऑनलाइन सुविधेद्वारे ते पाहता येते. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची माहिती दिलेली असते.

मिळकत पत्रिका

मालमत्ता महानगरपालिका क्षेत्रात असेल तर डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 135 रुपये, अ, ब, क नगरपालिका नगरपंचायतींसाठी 90 रुपये, तर ग्रामीण क्षेत्रासाठी 45 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अन्य ऑनलाइनच होईल.