Aadhaar Bank Linking Status : करा हे महत्त्वाचे काम, तरच मिळेल PM Kisan चा पुढील हप्ता.

Aadhaar-Bank-Linking-Status
Aadhaar Bank Linking Status
Aadhaar Bank Linking Status : केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेद्वारे आतापर्यंत 12 हप्ते वितरित करण्यात आले आहे. 10 व्या हप्त्यापासून या योजनेत बोगस लाभार्थी वगळण्यासाठी लाभार्थी शेतकर्‍यांना PM Kisan e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पीएम किसान केवायसी केल्यानंतर पीएम किसान योजनेत मोठे बदल झाले असून, ज्यांनी केवायसी केली आहे. आणि त्यांचे बँक खाते आधारशी लिंक (Aadhaar Bank Linking) आहे.


अशा लाभार्थ्यांचे पेमेंट मोड आधार झाले आहे. त्यामुळे त्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे आता आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा होत आहेत. ज्यांचे आधार बँक खात्यास लिंक नसेल त्यांना आता पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार नाही आहे.

असे चेक करा Aadhaar Bank Linking Status

आधार क्रमांक DBT पेमेंट येण्यासाठी कोणत्या खात्याशी लिंक (Aadhar Bank Linking Status) आहे, हे कसे चेक करावे ? आणि लिंक नसेल तर काय करावे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या लेखात पाहणार आहोत….
  • Aadhar Bank Linking चेक करण्यासाठी आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. – https://uidai.gov.in/en/
  • आधारच्या वेबसाईट वर आल्यनंतर सर्वात वरील टॅब मध्ये “My Aadhar” या ऑप्शनवर क्लिक करावे.
  • नंतर “Aadhar Services” या पर्यायाखाली 6 व्या क्रमांकावर “Check Aadhar Bank Linking Status” हा ऑप्शनवर क्लिक करावे.
  • आधार नंबर नमूद करण्यास सांगितले आहे. तिथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यावा.
  • नंतर पुढे दिलेला Captcha Code टाकून घ्यावा आणि Send OTP वर क्लिक करावे.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी नमूद करावा.
  • Submit OTP या पर्यायावर क्लिक करा आता तुमचे Aadhar Bank Linking Status या ठिकाणी दाखवण्यात येईल.
  • तुमचे Bank Seeding Status, Bank Seeding Date आणि Bank हा सर्व तपशील या ठिकाणी दाखवण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme

land survey map online : गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन तेही मोबाईल वरून .

५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana