सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना ७५ हजार रु. प्रति हेक्टर मोबदला । Saur Krushi Vahini Yojana - Krishi News

Saturday, 12 November 2022

सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना ७५ हजार रु. प्रति हेक्टर मोबदला । Saur Krushi Vahini Yojana

Saur-Krushi-Vahini-Yojana
Saur Krushi Vahini Yojana

Saur Krushi Vahini Yojana

    सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना 75 हजार रुपये प्रति हेक्टर मोबदला काल : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची (Saur Krushi Vahini Yojana) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी जमीन सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आलं आहे. 


    मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी (Saur Krushi Vahini Yojana) करता लागणाऱ्या जमिनी संदर्भात प्रतिवर्षी 75 हजार रुपये प्रती हेक्टर असा दर ठरवण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चार हजार मेगावॅट वीज निर्मीतीसाठी सरकार शेतकऱ्यांची जमीन भाडेपट्ट्यावर घेणार आहे. कृषी वाहिनीचे सौर उर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरण आणइ महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन दिली जाणार आहे.


    त्यासाठी 75 हजार रुपये प्रति हेक्टर प्रति वर्षे असा दर ठरवण्यात आला आहे. त्यासाठी प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर तीन टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येणार आहे.


    प्रत्येक जिल्ह्यातील महावितरणकडील एकूण कृषी वाहिन्यांपैकी किमान 30 टक्के कृषी वाहनांचे सौरऊर्जीकरण जलद गतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी (Saur Krushi Vahini Yojana) करता लागणारी जमिनी संदर्भात प्रतिवर्षी 75 हजार प्रती हेक्टर किंवा 2017 च्या निर्णयात नमूद केलेले सहा टक्के दरानुसार भाडे पट्ट्याचा जर निश्चित करावा असा आदेश देण्यात आला आहे.

👇👇👇👇👇

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.