Power Tiller : पॉवर टिलरसाठी मिळणार ८५ हजार पर्यंत अनुदान, पत्रात व अटी . - Krishi News

Saturday, 5 November 2022

Power Tiller : पॉवर टिलरसाठी मिळणार ८५ हजार पर्यंत अनुदान, पत्रात व अटी .


Power-Tiller
Power Tiller
Power Tiller : शेतकरी बंधुनो आपल्यासाठी खास योजना आपल्याला जर पॉवर टिलर (Power Tiller) घ्यायचाय तर चिंता करू नका. कारण पॉवर टिलर (Power Tiller) घेण्यासाठी शासन देताय ८५ हजार पर्यंत अनुदान. यालेखात तुम्हाला आम्ही योजनेबद्दल माहिती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता, अनुदान या बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.


Power Tiller

    शेती म्हंटल कि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि  हीच शेतकऱ्यांची ओळख, शेतीच्या कामासाठी मशागती साठी औजारे हा महत्वाचा घटक. यामध्ये शेतीच्या कामासाठी  विवध औजारांचा समावेश होतो. ट्रँक्टर, पेरणी यंत्र, पॉवर टिलर, नांगर, रोटाव्हेटर, वखर, सारा यंत्र इ. अशा विविध औजारांचा शेतीच्या मशागतीसाठी उपयोग होतो.


    पॉवर टिलर (Power Tiller) प्रामुख्याने उस चाळणी / बांधणे यासाठी उपयोग होतो. बरेच शेतकरी आता शेतात ऊस पिक घेतात. आणि यासाठी चाळणी/बांधणी बैलाच्या सहाय्याने/पॉवर टिलर च्या सहाय्याने करतात.

    पॉवर टिलर ट्रँक्टरपेक्षा लहान असल्यामुळे ऊस बांधणीकरिता त्याचा जास्त प्रमाणात वापर होतो. यामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचत होते. परंतु पॉवर टिलर (Power Tiller) यंत्राची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना घेण्यासाठी जास्त खर्च येतो. शासन शेतीशी निगडीत विविध योजना अनुदानावर राबवित असते. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान अंतर्गत शेतीच्या सर्व यंत्र व औजारे यासाठी अनुदान दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे / माहिती

 • आधार कार्ड झेरॉक्स.
 • बँक पासबुक झेरॉक्स.
 • ७/१२, ८अ उतारा.
 • मोबाईल नंबर.
 • अनु.जा./अनु.ज असल्यास जात प्रमाणपत्र.


अटी व शर्ती

 • लाभार्थी शेतकरी असणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थ्याच्या नावे ७/१२, ८ अ उतारा असणे बंधनकारक आहे.

हे करू नका ?

 • निवड होण्याआधी कोणतीही वस्तू/यंत्र खरेदी करू नका.
 • निवड झाल्यानंतर पूर्व संमती मिळाल्याशिवाय  खरेदी करू नये.
 • वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा लगेच वापर करू नका.

हे करा ?

 • अर्जाची निवड झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे विहित कालावधीत अपलोड करा.
 • पूर्वसंमती मिळाल्या नंतरच औजार/यंत्राची खरेदी करा.
 • आपण घेत असलेले यंत्र औजार पूर्वी कोणी घेतले नाही, याची खात्री करा.
 • अर्ज करताना अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.