या जिल्ह्याचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात, पहा कोणत्या पिकाला किती विमा | crop insurance claim - Krishi News

Sunday, 20 November 2022

या जिल्ह्याचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात, पहा कोणत्या पिकाला किती विमा | crop insurance claim

crop-insurance-claim
crop insurance claim

Crop Insurance Claim

    शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान झाल्या पासून ७२ तासांच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीला (agriculture insurance company) देणे अतिशय आवश्यक होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांनी सहकार्य करीत माहिती कंपनीकडे सादर केली. 

    कोणत्या जिल्ह्याला, किती मदत मिळणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पावसामुळे जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २६ हजार ८२५ शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा उतरविला.


Crop Insurance Claim

    झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले, पीक पाहणी झाली. तसा अहवाल पीक विमा कंपनीकडे (vima company) दिवाळीपूर्वी पाठविण्यात आला. पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीला जमा करण्यात येईल, असा विश्‍वास कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता.

    मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. मात्र दिवाळीनंतर जिल्ह्यातील १३ हजार १७० शेतकऱ्यांच्या खात्यात सात कोटी ३२ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.


    तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. खरीप पिकांच्या उत्पन्नावर आधारित अंतिम नुकसान भरपाईसाठी (Crop Damage Compensation) जिल्ह्याला १५ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

Crop insurance status

    त्यातील १३ हजार १७० शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानाची रक्कम (Crop Insurance) जमा करण्यात आली आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर मिळालेली रक्कम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.