Soil Testing : शेतकऱ्यांनो उत्पन्न वाढवायचे आहे तर माती परीक्षण आहे महत्वाचे. - Krishi News

Tuesday, 18 October 2022

Soil Testing : शेतकऱ्यांनो उत्पन्न वाढवायचे आहे तर माती परीक्षण आहे महत्वाचे.

Soil-Testing
Soil Testing

Soil Testing बदलत्या हवामानामुळे आपल्या शेतीच्या खाद्याची म्हणजेच खतांची मागणी पूर्ण करणे हे एक आव्हानात्मक कार्य बनले आहे. यासोबतच शेतकरी शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर नको तितका करत असल्यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस बिघडत चाललेला आहे.


हे वाचा : पिकाचं नुकसान झालं का ? करा हे काम तरचं मिळणार पीक विमा . 


    कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार कोणत्याही पिकांच्या चांगल्या उत्पादन वाढीसाठी जमिनीमध्ये एकूण 17 पोषक तत्वे योग्य मात्र मध्ये असणे आवश्यक आहे. पोषक तत्त्वांचा तुटवडा पडला की त्याचा परिणाम नक्कीच पिकावर होऊ शकतो. यासाठी शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकाची लागवड करण्या आधी किंवा पेरणी करण्याआधी आपल्या जमिनीचे माती परीक्षण (Soil Testing) करणे आवश्यक आहे.माती परीक्षण म्हणजे काय ? what is soil testing

    माती परीक्षण "Soil Testing" केले की तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये समजते की आपल्या जमिनीचे आरोग्य नक्की कसे आहे. म्हणजेच कोणकोणते पोषक तत्व आपल्या जमिनीमध्ये कमी आहेत किंवा जास्त आहेत, यासोबतच आपल्या मातीची रचना कशाप्रकारे आहे,  म्हणजेच मातीचा पीएच लेवल याबद्दल माहिती समजते. यामध्ये आपली माती आम्लयुक्त नॉर्मल क्षारीय या प्रकारापैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडत आहे. 


    अशावेळी कोणत्या संतुलित खतांचा वापर करावा. याबद्दल सुद्धा त्या रिपोर्टमध्ये म्हणजेच माती परीक्षणाच्या रिपोर्ट (soil testing report) मध्ये शिफारस केली जाते. दुसरीकडे तुम्ही माती परीक्षण न (Soil Testing) केल्यास तुम्हाला कोण कोणते पोषक तत्व जमिनीमध्ये आहेत हे समजत नाही. त्यामुळे आपण कोणतीही खते आणून शेतामध्ये टाकतो याचा परिणाम जमिनीच्या आरोग्यावरती होतो आणि पिकांचे उत्पादन वाढण्याऐवजी कमी होते. म्हणून माती परीक्षण (Soil Testing) खूप महत्वाचे आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.