माती परीक्षण करण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घ्या याबद्दल सर्व माहिती. | soil testing methods - Krishi News

Tuesday, 18 October 2022

माती परीक्षण करण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घ्या याबद्दल सर्व माहिती. | soil testing methods

soil-testing-methods
soil testing methods

अशाप्रकारे करा माती परीक्षण  soil testing methods

 • माती परीक्षण (soil test for agriculture) करण्यासाठी सर्वात प्रथम शेतामधून मातीचा नमुना घेणे आवश्यक आहे हा मातीचा नमुना लागवडीच्या सुमारे 15 ते 25 दिवस आधी घ्यावा.
 • मातीचा नमुना घेत असताना शेतामध्ये 6 ठिकाणी झिक झाक पद्धतीने (soil testing methods) मार्क करून त्या ठिकाणचा नमुना घ्यावा.
 • मातीचा नमुना शेतामधून गोळा करत असताना ज्या ठिकाणी मार्क केले आहे, त्या ठिकाणी गोल करून तो गोल अर्धा फूट खोल खोदून घ्यावा आणि हा गोल व्ही आकाराप्रमाणे खोदावा आणि त्यातून माती बाहेर काढावी.
 • अशाप्रकारे सहा ठिकाणाहून मातीचे नमुने गोळा करून घ्यावेत आणि ते एका तळवटावरती ठेवून व्यवस्थित मिक्स करावे.
 • व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्या मातीतून 500 ग्रॅम चा स्वच्छ मातीचा नमुना पारदर्शक कॅरीबॅग मध्ये भरावा. म्हणजेच अर्धा किलो माती कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये भरावी.
 • अर्धा किलो चा मातीचा नमुना कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये भरल्यानंतर त्या पिशवी वरती एक फॉर्म चिटकवायचा आहे. ज्या वरती शेतकऱ्यांचे नाव वडिलांचे नाव गाव तालुका जिल्हा शेतकऱ्यांच्या खाते क्रमांक आणि शेतकरी पुढे कोणते पीक घेणार आहे अशी माहिती त्यामध्ये लिहायची आहे.

मातीचे नमुने घेत असताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

 • मातीचा नमुना गोळा करत असताना शेताची रचना चढउताराची असेल तर उंचीपेक्षा कमी ठिकाणाहून मातीचे नमुने गोळा करावेत.
 • मातीचे नमुने घेत असताना शेतातील काड्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी, कंपोस्ट खताचे आपण ढीग लावतो किंवा रासायनिक खताच्या ढीग लावतो अशा ठिकाणी किंवा त्यांच्या आसपास चे मातीचे नमुने घेऊ नये.
 • शेताच्या बाजूला एखादे झाड उभा असेल तर त्या झाडाच्या सावली खालील मातेचा नमुना घेऊ नये.
 • कंपोस्ट पिशवीमध्ये मातीचा नमुना गोळा करू नये.
 • शेतामध्ये उभे पीक असेल तर अशावेळी सुद्धा मातीचा नमुना घेऊ नये.
 • शेतामध्ये खताचा वापर केला असेल तरीसुद्धा मातीचा नमुना अशावेळी घेऊ नये.
 • पावसानंतर किंवा जमिनीमध्ये चिखल असतो अशावेळी सुद्धा मातीचा नमुना घेऊ नये. शेत जेव्हा पूर्णपणे कोरडे असते यावेळीच मातीचा नमुना घ्यावा. soil test

मातीचा नमुना कोठे पाठवाल ? soil testing laboratory

    अर्धा किलो मातीचा नमुना घेतल्यानंतर त्यावरती वरती दिलेली माहिती भरल्यानंतर तुम्ही हा अर्धा किलोचा माती नमुना माती परीक्षण "soil testing methods" प्रयोगशाळेमध्ये किंवा स्थानिक कृषी विद्यालयांमध्ये किंवा कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये परीक्षणासाठी देऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही दिवसांमध्येच रिपोर्ट मिळेल त्यामध्ये आपल्याला आपल्या जमिनीच्या आरोग्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. व पुढे कोणकोणत्या खताचा वापर किती प्रमाणात करावा या याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती त्या रिपोर्टमध्ये दिली जाईल. 

माती परीक्षणचे महत्व importance of soil testing

    माती परीक्षण केल्यामुळे आपल्या शेताच्या मातीमध्ये नेमके कोणते पोषक तत्वे किती प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांचे प्रमाण किती आहे हे समजायला मदत होते त्यामुळे आपल्याला पुढील पिक घेत असताना त्या पिकासाठी नेमक्या कोणत्या खतांचा वापर करावा लागणार आहे याची अचूक माहिती माती परीक्षण (soil testing methods) रिपोर्ट मध्ये मिळाल्यामुळे अनावश्यक खात्न्चा वापर टाळता येतो त्यामुळे एकतर पैशांची मोठी बचत होते तसेच जमिनीचा पोट सुद्धा खराब होण्यापासून वाचवता येतो. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.