Mahadbt : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान. - Krishi News

Monday, 10 October 2022

Mahadbt : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान.


Mahadbt
Mahadbt 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 

    महाराष्ट्र सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना "Mahadbt" राबवीत आहे. अशाच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान हे महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे. तरी आज आपण या लेखांमध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय आहेत ? कागदपत्रे कोणते लागतील ? तसेच या योजनेचा अर्ज कसा भरायचा ? याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.


Mahadbt 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
 • आधार कार्ड. 
 • बँक पासबुक . 
 • सातबारा व आठ अ उतारा . 
 • हमीपत्र . 
 • जातीचे प्रमाणपत्र . 
 • इत्यादी.


योजनेसाठी पात्रता

 1. लाभार्थ्याला फळबाग लागवडीसाठी "Mahadbt" आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्था करणे बंधनकारक असेल.
 2. अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर ती जमीन असणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्याची जमीन संयुक्त मालकीची असेल तर त्यावेळेस इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या आयुष्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
 3. शेतकऱ्याने अगोदर या योजनेचा "Mahadbt" लाभ घेतलेला नसावा.
 4. शेतकरी आयकर भरणारा नसावा.
 5. शेतकऱ्यास सरकारी नोकरी नसावी."Mahadbt"

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.