हरभरा पेरणीचा विचार आहे ? मग ही आहेत सर्वात चांगली ५ सुधारीत वाणांबद्दल सविस्तर माहिती. Harbhara Lagwad - Krishi News

Tuesday, 11 October 2022

हरभरा पेरणीचा विचार आहे ? मग ही आहेत सर्वात चांगली ५ सुधारीत वाणांबद्दल सविस्तर माहिती. Harbhara Lagwad

Harbhara-Lagwad
Harbhara Lagwad
    Harbhara Lagwad : मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की मागील वर्षी सोयाबीन पिकाला उच्चांकी असा भाव मिळाला होता. यावर्षीही खरीप हंगाम २०२२ मध्ये सोयाबीन पिकाला गत हंगामासारखा चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. परंतू राज्यात जुन ते सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Harbhara Lagwad

    यावर्षी खरीप हंगामात चांगले उत्पन्न होईल या आशेवर बसलेल्या शेतकर्‍यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान येत्या रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेने आता शेतकरी वर्ग येत्या रब्बी हंगामाकडे बघत आहे. परंतू येत्या रब्बी हंगामात कोणते रब्बी पीक घ्यावे? हा सुद्धा एक मोठा प्रश्न शेतकर्‍यांसामोर असणार आहे.

Harbhara Lagwad 

    मित्रांनो, रब्बी हंगाम म्हटला की दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा जास्तीत जास्त कल हा हरभरा "Harbhara Lagwad" पिकाकडे वाढत चालला आहे. कडधान्य पिके ही बहुतांशी खरीप हंगामामध्ये पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. मात्र हरभरा हे कडधान्य पीक असूनही रब्बी हंगामामध्ये घेतले जाते. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा 'Harbhara Lagwad' हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे.
    मागील काही वर्षापासून राज्यात हरभरा "Harbhara Lagwadया पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. सन २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र २५.९४ लाख हेक्टर, उत्पादन २८.६६ लाख टन तर उत्पादकता ११०५ किलो/ हेक्टर अशी आहे. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा २२.७३ टक्के आहे. तर येत्या रब्बी हंगामात राज्यात हरभरा (Harbhara Lagwad) पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.


योग्य वाणांची निवड हेच महत्त्वाचे सूत्र

    मित्रांनो, हरभरा "Harbhara Lagwad" या पिकाला सर्वात कमी पाण्याची गरज असते आणि कमीत कमी उत्पादन खर्चात हे पीक घेता येते. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारीत वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते. रब्बी हंगाम आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे हरभरा 'Harbhara Lagwad' पीक घेत असताना नेमके कोणते वाण निवडावे ? 

    हा प्रश्नही अनेक शेतकरी बांधवांना पडलेला असणार, यात शंका नाही. हरभरा (Harbhara Lagwad) पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल, तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणार्‍या आणि रोगप्रतिकारक्षम सुधारीत वाणांचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण 

👇👇👇👇👇

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.