खरीप पिक विमा २०२२ , पिकाचं नुकसान झालं का ? पीक विमा क्लेम कसा करायचा | crop insurance claim - Krishi News

Tuesday, 4 October 2022

खरीप पिक विमा २०२२ , पिकाचं नुकसान झालं का ? पीक विमा क्लेम कसा करायचा | crop insurance claim

crop-insurance-claim
Crop Insurance Claim

Crop Insurance Claim :

    नमस्कार शेतकरी मित्रांनो आज खरीप पिक विमा 2022 बद्दल महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊन देखील पिक विमा मिळत नाही. कारण त्यांना आपल्या पिकाचे नुकसान झाल्यावर त्याची पिक विमा कंपनीकडे तक्रार (agriculture insurance company) देता येत नाही. दरवर्षी शेतकरी पिक विमा भारतात व दरवर्षीप्रमाणे सरसकट पीक विमा मंजूर होईल याची वाट पाहतात. परंतु  प्रत्येक वर्षी तुमच्या महसूल मंडळात पिक विमा मिळेलच असे नाही. 


    हंगामाच्या शेवटी  उंबरठा उत्पन्न व तुमच्या महसूल मंडळातील जी पैसेवारी जाहीर झाली असेल त्यावरून सरसकट पिक विमा जाहीर केला जातो. जर तुमच्या महसूल मंडळात पैसेवारी जास्त लागली असेल व उंबरठा उत्पन्न देखील जास्त असेल तर तुमच्या महसूल मंडळात सरसकट पिक विमा मंजूर होणार नाही. परंतु जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे नुकसानीचा दावा दाखल करू शकता. ७२  तासाच्या आत शक्य नसेल  तर तुम्ही नंतर देखील दावा दाखल करू शकता. 
No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.