हरभरा पिकांच्या ५ सुधारीत वाणांबद्दल सविस्तर माहिती. Chana Variety in india - Krishi News

Tuesday, 11 October 2022

हरभरा पिकांच्या ५ सुधारीत वाणांबद्दल सविस्तर माहिती. Chana Variety in india


Harbhara-Variety
Harbhara Variety

हरभरा पिकाचे ५ सुधारीत वान – Harbhara Variety 

१) हरभरा – विजय (Harbhara – Vijay)

 • प्रसारीत वर्ष  –  सन १९९३ साली प्रसारीत. 
 • विद्यापीठ  – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी द्वारे प्रसारीत. 
 • जमीन  – मध्यम ते भारी काळी, ४५ ते ६० सें. मी. खोली असलेली जमीन. 
 • हवामान  – किमान १०° ते १५° से. आणि कमाल २५° ते ३०° से. तापमान. 
 • पेरणीचा कालावधी - जिरायती – २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर,  बागायती  - २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर. 
 • प्रति एकर बियाणे  – ३५ ते ४० किलो. 
 • पीक परिपक्वतेचा कालावधी  – १०५ ते ११० दिवस. 
 • उत्पादकता - जिरायती  – सरासरी १४ क्विं./हे, बागायत  – सरासरी २३ क्विं./हे.  
 • वैशिष्टे/गुणधर्म  – मर रोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादनक्षमता, अवर्षण प्रतिकारक्षम, जिरायत, बागायत तसेच उशीरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याकरिता प्रसारित

२) हरभरा – विशाल (Harbhara – Vishal)

 • प्रसारीत वर्ष  – सन १९९५ साली प्रसारीत. 
 • संशोधन केंद्राचे नांव  – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. 
 • जमीन  – मध्यम ते भारी काळी, ४५-६० सें.मी.खोली असलेली जमीन. 
 • हवामान  – तापमान किमान १०-१५° से, कमाल २५-३०° से, पाऊसमान : ७५०-१००० मिमी. 
 • पेरणीचा कालावधी  – २० सप्टें. ते १० ऑक्टो.,  बागायत जिरायती  : २० ऑक्टो. ते १० नोव्हें.
 • प्रती एकर बियाणे  – ३५ ते ४० किलो. 
 • पिकाचा कालावधी  – ११० ते ११५ दिवस. 
 • उत्पादकता - जिरायती – सरासरी १३ क्विं./हे., बागायत  – सरासरी २० क्विं./हे.
 • वैशिष्टे / गुणधर्म  – मर रोग प्रतिकारक्षम, बागायतास योग्य, आकर्षक पिवळसर तांबुस टपोरे दाणे अधिक बाजारभाव, पश्चिम महाराष्ट्राकरीता प्रसारित

३) हरभरा – दिग्विजय (Harbhara Digvijay)

 • प्रसारीत वर्ष  – सन २००६. 
 • संशोधन केंद्राचे नांव  – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
 • जमीन  – मध्यम ते भारी काळी, खोली- ४५-६० सें.मी.
 • हवामान  – तापमान : किमान १०-१५° से, कमाल २५-३०° से, आर्द्रता : २१-४१%, पाऊसमान : ७५०-१००० मिमी. 
 • पेरणीचा कालावधी : जिरायत : २० सप्टें. ते १० ऑक्टो.,  बागायत  : २० ऑक्टो. ते १० नोव्हें.
 • प्रती एकर बियाणे  – ३५ ते ४० किलो. 
 • पिकाचा कालावधी  – ९० ते ९५ दिवस (दक्षिण भारत) . 
 • उत्पादकता –  जिरायत  – सरासरी १४.०० क्विं./हे.,  बागायत  – सरासरी २३.०० क्विं./हे., 
 • उशीरा पेर  -- सरासरी २१.०० क्विं./हे.
 • वैशिष्टे / गुणधर्म  – मर रोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादनक्षमता, टपोरे दाणे, जिरायत, बागायत तसेच उशीरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित. 

४) हरभरा – जाकी – ९२१८ (Harbhara Jaki 9218)

 • प्रसारीत वर्ष  – सन २००५. 
 • संशोधन केंद्राचे नांव  – पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 
 • जमीन  – मध्यम ते भारी काळी. 
 • हवामान  – तापमान : किमान १०-१५° से, कमाल २५-३०° से.
 • पेरणीचा कालावधी  – ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा. 
 • प्रती एकर बियाणे  – ३० ते ३५ किलो . 
 • पिकाचा कालावधी  – १०५ ते ११० दिवस. 
 • उत्पादकता  – सरासरी १८ ते २० क्विं./हे.
 • वैशिष्टे / गुणधर्म  – मर रोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादनक्षमता, टपोरे दाणे, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित. 

५) हरभरा – फुले विक्रम (Harbhara Fule Vikram)

 • प्रसारीत वर्ष  – सन २०१६. 
 • संशोधन केंद्राचे नांव  – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. 
 • जमीन  –  मध्यम ते भारी काळी, खोली- ४५-६० सें.मी.
 • हवामान  – तापमान : किमान १०-१५° से, कमाल २५-३०° से.
 • पेरणीचा कालावधी : जिरायत  : २० सप्टें. ते १० ऑक्टो.,  बागायत : २० ऑक्टो. ते १० नोव्हें.
 • प्रती एकर बियाणे  –  ३० किलो. 
 • पिकाचा कालावधी  – १०५ - ११० दिवस. 
 • उत्पादकता –  जिरायत  सरासरी : १६.०० क्विं./हे., बागायत :  सरासरी : २२.०० क्विं./हे., उशीरा पेर :  सरासरी : २१.०० क्विं./हे.
 • वैशिष्टे / गुणधर्म  – वाढीचा कल उंच वाढणारा असल्यामूळे यांत्रिक पद्धतीने, काढणी करण्याकरीता योग्य वाण, मध्यम आकाराचे दाणे, जिरायत, बागायत तसेच उशीरा पेरणीस योग्य. महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित, मर रोगास प्रतिकारक्षम.
   
    मित्रांनो, देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विक्रांत हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत आणि काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पी.के.व्ही – २ (काक-२) पीकेव्ही -४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. 

    पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात. या शिवाय फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे. विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नविन वाण यांत्रीक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारीत केला आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.