या शेतकर्‍यांनाही आता ७५५ कोटी रुपयांची मदत जाहीर. Ativrushti Nuksan Bharpai - Krishi News

Monday, 3 October 2022

या शेतकर्‍यांनाही आता ७५५ कोटी रुपयांची मदत जाहीर. Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti-Nuksan-Bharpai
Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai 

    मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ मध्ये राज्यभरात अतिवृष्टी, पुरस्थिती, किडींचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली होती, परंतु निकषात बसत नसल्याने अनेक शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागणार होते. पण आता अशा शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. (Ativrushti Nuksan Bharpai) 

बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

    अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

    नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


Ativrushti Nuksan Bharpai 


    औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.