५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra - Krishi News

Monday, 3 October 2022

५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

Ativrushti-Nuksan-Bharpai-Maharashtra
Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

    आतापर्यंत सुमारे ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटीच्या निधीमुळे अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सुमारे ३ हजार ९५४ कोटी रुपयांचा मदत निधी वितरित

    राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. 
    त्यानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सुमारे ३४४५.२५ कोटी आणि ५६.४५ कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास ९८.५८ कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

खालील जिल्ह्यांना होणार लाभ 

 • औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र. 
 • जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र. 
 • परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र. 
 • हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र. 
 • बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र. 
 • लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र. 
 • उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र. 
 • यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र. 
 • सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र. 
 • एकूण क्षेत्र- ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र. 
 • एकूण निधी – सुमारे ७५५ कोटी रुपये

    तर मित्रांनो अशाप्रकारे अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. 


    याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. ह्याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेतली आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहचवा, त्यासाठी खाली शेअर करण्यासाठी विविध पर्याय दिसत असतील, त्यावर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.