Aadhar Card Address Change | असा अपडेट करा आधार कार्डावरील पत्ता सोप्या पद्धतीने. - Krishi News

Thursday, 20 October 2022

Aadhar Card Address Change | असा अपडेट करा आधार कार्डावरील पत्ता सोप्या पद्धतीने.

Aadhar-Card-Address-Change
Aadhar Card Address Change

आधार कार्डावरील पत्ता सोप्या पद्धतीने

खालील पायऱ्यांचा अवलंब करून पत्ता बदलू शकतो. (Aadhar Card Address Change)
 1. आधार कार्डावरील माहितीमध्ये सुधारणा करण्यासाठी UIDAI – https://uidai.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर जा.
 2. होमपेजवरील ‘My Aadhaar’  या पर्यायावर क्लिक करा.
 3. त्यामधील Update Your Aadhaar  या सेक्शनमधील ‘Update Demographics Data & Check Status’ वर क्लिक करा.
 4. आता आपल्यासमोर आलेल्या पेजवरील  ‘Login’  वर क्लिक करा.
 5. समोर आलेल्या Enter Aadhaar  या रकान्यात आपला आधार क्रमांक टाका आणि Enter Above Captcha याठिकाणी वर असलेला कॅप्चा टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
 6. त्यानंतर तुमच्या आधारला सलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तो Enter OTP  याठिकाणी टाकून  ‘Login’ वर क्लिक करा.

Aadhar Card Address Change

 1. आता Online Update Services वर क्लिक करून Update Aadhaar Online हा पर्याय निवडा.
 2. समोर आलेल्या सूचना पूर्ण वाचून घ्या  व Address हा पर्याय निवडून Proceed To Update Aadhaar वर क्लिक करा.
 3. आता आपल्यासमोर जुना पत्ता येईल तो वाचून घेऊन त्याखालील पत्ता बदलण्यासाठी रकाने येतील त्यात आपला योग्य तो नवीन पत्ता टाकावा.
 4. नवीन पत्ता टाकतांना तो पत्ता इंग्लिश व आपली स्थानिक भाषा या दोन्हीमध्ये अचूकपणे नोंदवावा. आपल्यासमोर बदलेल्या पत्त्याचा नमुना पाहू शकतो.
 5. आता तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा.
 6. आवश्यक ते बदल करून नवीन पत्त्याची खात्री झाल्यानंतर Submit the Request  वर क्लिक करा.
 7. पत्त्यातील बदलासाठी विनंती सबमिट झाल्यानंतर आपल्यासमोर बदलासाठीचे शुल्क ५० रु. भरण्यासाठी पेमेंट पोर्टल येईल तेथे UPI, Net Banking किंवा इतर पर्यायांचा वापर करून ५० रु. शुल्काचा ऑनलाईन भरणा करा.
 8. आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठीचे शुल्क भरल्यानंतर आपल्याला एक URN – Updated Request Number प्राप्त होईल.
 9. या प्राप्त झालेल्या URN क्रमांकाचा वापर करून आपण वेळोवेळी आपल्या बदलांची सद्यस्थिती माहिती करू शकतो.
 10. आधार कार्डवरील पत्त्यामध्ये बदल करण्याकरिता ऑनलाईन विनंती केल्यानंतर ९० दिवसांचे आत ते बदल होईल व नवीन बदललेल्या पत्त्यावर आपले अपडेटेड आधार कार्ड येईल.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.