Rain : विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज. - Krishi News

Friday, 23 September 2022

Rain : विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज.

Rain
Rain 
    मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भ (Vidarbha), उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain) आहे. उत्तर भागातील जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता हवामान (Today Weather)  विभागाने वर्तविली.
    मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास (Today Weather) सुरू केला आहे. मंगळवारी राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. बुधवारी (Today Weather) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरापासून उत्तर पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.(Today Weather)
    विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. आज (Today Weather) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (yellow alert) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन व्हा...!