Nuksan Bharpai : नुकसान भरपाई पहा कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार.
नुकसान भरपाई
जून ते ऑगस्ट , 2022 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. 1 व 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण शेतीपिके
व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता अनुक्रमे रु. 344525.55 लक्ष व रु. 5645.66 लक्ष असा एकूण रु. 350171.21 लक्ष इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र अ- 1 व प्रपत्र अ-2 मध्ये जिल्हा निहाय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. “Nuksan Bharpai ”
पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी. “Nuksan Bharpai ”
सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा. लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. {Nuksan Bharpai }
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?