land record : जमिनीचा पुरावा असलेला सातबारा खरा आहे का बोगस ? जाणून घेण्यासाठी तपासा " या " तीन गोष्टी.
![]() |
land record |
Land Record : भली मोठी शेतजमीन असो वा जमिनीचा तुकडा जमीन "land record" म्हटलं की, जमिनीचा मालकी हक्क आलाच. मात्र अनेकदा या जमिनीच्या मालकी हक्कावरून मोठमोठे वाद होतात. त्याचवेळी जमिनीचा मुख्य पुरावा हा जमिनीचा सातबारा उतारा असतो. या उतऱ्यावरून शेतजमीन (Agriculture) कोणाची आहे किती आहे ते सिद्ध होते. जमिनीची "land record" खरेदी आणि विक्री करताना या सातबारा (Satbara Utara) उताऱ्याची पाहणी केली जाते. मात्र अनेकदा बोगस सातबारा वापरून कर्ज (Loan) घेतले जाते.
तलाठ्यांची सही पडताळावी
जमिनीची खरेदी "land record" विक्री करताना सातबारा उताऱ्यावर (7/12 utara) तलाठ्यांनी सही केलेली असते. ज्यावेळी बोगस सातबारा असतो तेव्हा त्यावर तलाठ्यांनी सही नसते. यावरून तुम्ही सातबारा उतारा (7/12 utara) खरा आहे की बोगस हे समजू शकता. गेल्या दीड वर्षांपासून आता सातबाऱ्यावर डिजिटल सही केली जात आहे.
क्यूआर कोड
आता आधुनिक जगात सगळ काही डिजिटल होत आहे. त्याचवेळी आता जमिनीचा सातबारा देखील सध्या ऑनलाईन स्वरूपात शेतकरी पाहू शकता. जर तुमच्या सातबारा उताऱ्यावर (7/12 utara) क्यूआर कोड दिला नसेल तर तुमचा सातबारा उतारा बोगस आहे असे समजा. हा कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला ओरिजिनल सातबारा दिसेल.
LGD कोड व ई-महाभूमीचा लोगो
आता नव्या बदलांनुसार सातबाऱ्यावर त्या गावचा युनिक कोड देखील देण्यात येतो. जर हा कोड तुमच्या सातबाऱ्यावर असेल तरच तुमचा सातबारा ओरिजिनल असेल. अन्यथा तो बोगस असतो. त्याचबरोबर 2 मार्च 2022 ला राज्य सरकारने सातबारा उताऱ्यावर (7/12 utara) महाराष्ट्र शासनाचा व ई-महाभुमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यासाठी मान्यता दिली आहे. जर तुमच्या सातबाऱ्यावर हा लोगो असेल तर तुमचा सातबारा "land record" ओरिजिनल असेल अन्यथा बोगस. अशाप्रकारे तुम्ही तुमचा सातबारा खरा आहे की खोटा हे पडताळू शकता.
त्याचबरोबर जमीनीचा "land record" व्यवहार करताना नवीन अपडेट केलेलाच सातबारा वापरावा. म्हणजे तुमची फसवणूक टळेल. कारण अपडेट केलेल्या सातबाऱ्यावरच हे नवे डिजिटल स्वरूपाचे बदल दिसून येतील.
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?