Cotton Crop Management : कापूस पिकाचे व्यवस्थापन कसे कराल ? - Krishi News

Thursday, 15 September 2022

Cotton Crop Management : कापूस पिकाचे व्यवस्थापन कसे कराल ?

Cotton-Crop-Management
Cotton Crop Management
व्यवस्थापन कसे कराल ?

  1. कपाशीतील (Cotton Crop) नैसर्गिक पातेगळ रोखण्यासाठी नॅपथेलिन ॲसीटीक ॲसीड (एनएए) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  2. पिकामध्ये दोन महिन्यानंतर नत्रयुक्त खताची मात्रा देण्यासाठी बागायती साठी ५२ किलो आणि कोरडवाहू साठी ३१ किलो युरिया प्रति एकर द्यावा.
  3. अधिक उत्पादनासाठी कापूस (Cotton Crop) पिकामध्ये २ टक्के डीएपी (२०० ग्रॅम) अधिक ५० ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
  4. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कपाशीच्या शेतामध्ये २० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फुले लागण्याच्या आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत फवारावे.
  5. फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारशीतच वापरावे. कमी पाणी वापरल्यास कीड व रोगांचे अपेक्षित व्यवस्थापन होत नाही.(Cotton Crop)

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन व्हा...!