सोयाबीन आणि कापसाला मिळणार " इतका " भाव. cotton and soybean rate
![]() |
cotton and soybean rate |
यंदा कापसाला किती मिळणार भाव ?
यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रात 3 लाख हेक्टरने वाढ झाली आहे. म्हणजेच सध्या देशात एकूण 42 लाख 29 हजार हेक्टर इतके क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आहे. त्याचवेळी सध्या कापसाला चांगला दर मिळत आहे. 15 सप्टेंबरला पाऊस जातो मात्र, यंदा महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस राहील असा अंदाज आहे. याच कारणामुळे नवा कापूस बाजारात उशिरा दाखल होऊ शकतो.
नवा कापूस बाजारात उशिरा दाखल झाल्यास बाजारात कापसाची आवक कमी होईल आणि याच कारणामुळे कापसाच्या दरात वाढ होऊ शकते. यंदा कापसाला (लांब धागा) 6 हजार 380 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव देण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांना या हमीभावापेक्षा जास्तच दर मिळू शकतो. जवळपास 8 ते साडे आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकतो. असा अंदाज वर्तवला जात आहे.
सोयाबीनला किती मिळणार भाव ?
यंदा पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. जरी गेल्यावर्षीचा साठा शिल्लक असला तरी यंदा कमी उत्पादन निघाल्याने देशात सोयाबीनचा साठा कमी असेल. त्यामुळे यंदा सोयाबीनला चांगला दर मिळणार असल्याची शक्यता आहे. सोयाबीनला यंदा 5 हजारांपेक्षा अधिक दर मिळू शकतो. तर 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?