50 हजार कर्जमाफी याद्या कुठे पाहायला मिळेल ? Loan - Krishi News

Wednesday, 28 September 2022

50 हजार कर्जमाफी याद्या कुठे पाहायला मिळेल ? Loan

Loan
Loan

50 हजार कर्जमाफी याद्या कुठे पाहायला मिळेल 

    सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रत्येक गावातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर वर पाहायला मिळतील. तसेच तुमच्या बँकेत देखील तुम्हाला याद्या पाहायला मिळतील. तेथून सर्व शेतकरी आपल्या यादीत नाव आहे का व त्यामध्ये काही त्रुटी आहेत का हे देखील चेक करू शकता. जर तुमचे नाव यादीत आले नाही किंवा त्यात काही त्रुटी असेल तर यासाठी तुम्ही तुमच्या बँकेकडे संपर्क करू शकता.

कर्जमाफीस पात्र झाल्यावर करावयाची कार्यवाही

    कर्जमाफीस पात्र झाल्यानंतर किंवा यादीत नाव आल्यानंतर तुम्हाला  तुमच्या गावातील सीएससी सेंटर वर जाऊन तुमचे आधार व्हेरिफिकेशन करावे लागेल. आधार वेरिफिकेशन करणे अनिवार्य आहे. महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत ही योजना राबवली जात आहे त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना सीएससी सेंटर वर जाऊन आपले अंगठा किंवा आधार चा ओटीपी देऊन आधार वेरिफिकेशन करणे अनिवार्य असणार आहे.


५० हजार खात्यात कधी येणार ?

    आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शासनाकडून पन्नास हजार प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात क्रेडिट केली जाईल. ही रक्कम आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच्या काही दिवसानंतर किंवा काही आठवड्या नंतर बँक खात्यात येऊ शकते. एखाद्या परिस्थितीमध्ये ही रक्कम खात्यात येण्यास पंधरा दिवस ते एक महिना देखील लागू शकतो.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.