Crop Insurance : शिंदे सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देणारं दुप्पट मदत, जाणून घ्या काय आहेत निकष.
![]() |
Crop Insurance |
Crop Insurance : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुमारे 40 दिवसांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर बुधवारी 10 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त (Agriculture) शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत जाहीर केली आहे. तर याबाबत काय निकष काय आहेत हे जाणून घेऊयात.
मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान 'Crop Insurance' झालं होतं. यामध्ये 15 लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं.
तरीही आत्तापर्यंत आलेल्या 15 लाख हेक्टर शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवेसना-भाजप युतीनं विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नव्हती.
तेवढी म्हणजे एनडीआरएफच्या नियमांप्रमाणं जेवढी मदत दिली जात होती. त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचबरोबर दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे.”
किती मिळणार रक्कम?
आता मुख्यमंत्र्यांनी बैठकीत शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेतला आहे. तर
शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार प्रति हेक्टर 6,800 रुपये मिळत होते. आता शेतकऱ्यांना दुप्पट म्हणजेच 13,600 रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येणार आहे.
काय आहेत निकष ?
तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (जिरायती) हेक्टरी 6800 रुपये प्रमाणे मदत राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या निकषानुसार दिली जाते. शेतकऱ्यांना हिच मदत दोन हेक्टरपर्यंतच दिली जायची. जी आता मदत हेक्टरी 13 हजार 600 रुपये इतकी दिली जाणार आहे.
तर ही मदत आता तीन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीतजास्त 40 हजार 800 रुपये मदत मिळणार आहे.
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?