जमीन खरेदी करतं या गोष्टी लक्षात ठेवा. Land Record Maharashtra - Krishi News

Wednesday, 27 July 2022

जमीन खरेदी करतं या गोष्टी लक्षात ठेवा. Land Record Maharashtra

 1. जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणे (Land Map):-

    ज्या गटातील शेतजमीन Land Records खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा Land Map पाहणं गरजेचं असतं. यामुळे एकतर आपल्याला जमिनीची हद्द कळते. Map नकाशाप्रमाणे जमिनीची हद्द तपासून घ्यावी. दुसरं म्हणजे चतु:सीमा कळते. आपण जी जमीन Land Records खरेदी करतोय, त्याच्या चारही बाजूंना कोणते गट नंबर आहेत, याची माहिती स्पष्ट होते.

land-map
land map

2. शेत रस्ता :- 

    जी जमीन "Land Records" खरेदी करायची आहे, तिथं जाण्यासाठी शेतरस्ता आहे की नाही, ते पाहावं.
    जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो. पण, जमीन "Land Records" बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.

3. खरेदी खत :-

    तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे.

    यात गट नंबर, मूळ मालकाचं नाव, चतु:सीमा, क्षेत्र बरोबर आहे की नाही ते तपासून घ्यावं.

हे वाचा :-

4. भूधारणा पद्धत तपासून घेणे

    एकदा का सातबारा उतारा हातात आला की त्यावर जी जमीन "Land Records" खरेदी करायची आहे, ती कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, हे पाहावं. सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धतीची नोंद केलेली असते. जर सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग- 1 पद्धत असेल, तर भोगवटादार वर्ग- 1या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. 
    म्हणजे ही जमीन "Land Records" विक्री करणाऱ्याच्या स्वत:च्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही, असा याचा अर्थ होतो. पण, सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग- 2 असं नमूद केलं असेल, तर या जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. 

    जमिनींचा समावेश होतो. जर सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग - 2 असं असेल तर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच ती जमीन "Land Records" खरेदी करावी. याव्यतिरिक्त 'सरकारी पट्टेदार' या प्रकारच्या जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.