जमीन Land खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये यासाठी आधी एक कागद आवर्जून पाहायला सांगतात. ते म्हणजे खरेदी खत.
![]() |
land record maharashtra |
खरेदी खत म्हणजे काय तर जमिनीच्या Land Record मालकी हक्काचा प्रथम पुरावा. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते. खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग 7/12 Utara वर नवीन मालकाची नोंद होते.
खरेदी खत, जुने दस्त असे पाहा...
इथं तुम्ही मिळकत निहाय आणि दस्त निहाय जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता. मुंबई, उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शहरी भाग अशा 3 प्रकारांमध्ये तो सर्च करता येतो. सुरुवातीला आपण मिळकत निहाय जमिनीचा रेकॉर्ड सर्च कसा करायचा ते पाहूया.
आता आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड पाहायचा असल्यानं इथं उर्वरित महाराष्ट्र निवडायचं आहे. इथं सुरुवातीला वर्षं निवडायचं आहे. तुम्ही पाहू शकता की, इथं 1985 पासूनच्या खरेती खतांचा, दस्तांचा रेकॉर्ड उपलब्ध आहे.
त्यानंतर जिल्हा, तहसील कार्यालय आणि गाव निवडायचं आहे. मग मिळकत क्रमांक टाकायचा आहे. इथं कंसात लाल अक्षरात स्पष्ट लिहिलंय की, सर्व्हे नंबर / मिळकत नंबर / गट नंबर / प्लॉट नंबर टाकू शकता.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?