![]() |
land map online |
जमिनीचा नकाशा कसा पाहायचा ?
जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला या mahabhunakasha.mahabhumi.gov.in वेबसाईट्वर याचा आहे किंवा इथे क्लिक पण तुम्ही जाऊ शकतात.
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
आता सुरुवातीला गावाचा नकाशा कसा काढायचा याची माहिती पाहूया.
या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो.
होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?