अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी. E Pik Pahani App - Krishi News

Friday, 8 July 2022

अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी. E Pik Pahani App

E-Pik-Pahani-App
E Pik Pahani App

पिकांची नोंद करण्याची प्रक्रिया :-

    ई-पीक पाहणी अँप्स  डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani असं सर्च करू शकतात.किंवा येथे क्लिक करून अँप्स इन्स्टॉल करू शकतात. इस्टॉलेशन कम्प्लीट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. 
    त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख कार्यालय, महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. ई-पीक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. असं तिथं नमूद केलेलं असेल. 

    याला डावीकडे सरकवल्यास हे अँप्स वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल. पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी. इथं असलेल्या पुढे या पर्यायावर क्लिक करायचं आहे. 
    मोबाईल नंबर टाकून पुढे वर क्लिक करायचं आहे. जिल्हा, तालुका गाव निडून पुढेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खातेदार निवडायचा आहे. पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच गटक्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता. गटक्रमांक टाकून शोधावर क्लिक करायचं आहे. 

    मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. मग नोंदणी अर्जासाठी आपण निवडलेली माहिती तपासून पाहायची आहे. त्यानंतर पुढे या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जो मोबाईल क्रमांक सुरुवातीला दिला त्यावर तुमची नोंदणी करण्यात येत आहे, असा मेसेज तिथं येईल. तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा किंवा पुढे वर क्लिक करा. 
    या नंबरवर एक सांकेतांक क्रमांक पाठवला जाईल. हाच नंबर या अँप्सवर शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी वापरावा लागणारा आहे. आता तिथं एक सूचना येईल - मोबाईलवर सांकेतांक क्रमांक पाठवला आहे, तो स्क्रीनवरील रिकाम्या चौकटीत टाका. इथं ठीक आहे असं म्हणायचं आहे. मोबाईलवर आलेला सांकेतांक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि सांकेतांक भरा यावर क्लिक करायचं आहे. 

    आता पीक पाहणीच्या अँप्सवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथं सुरुवातीला परिचय द्यायचा आहे. यात खातेदाराचा फोटो असेल तर तो निवडायचा आहे. त्यानंतर लिंग निवडलं की खातेदाराचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर तिथं आपोआप येऊन जाईल. मग खातेदाराची माहिती यावर क्लिक करायचं आहे. 
    त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे. मग परिचयमध्ये परत येऊन सबमिट वर क्लिक करायचं आहे. तुमची नवीन माहिती अद्यावत झाली असा तिथं मेसेज येईल. इथं ठीक आहे वर क्लिक करायचं आहे. आता पुन्हा होमवर परत यायचं आहे. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.