अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी, जाणून घ्या ई-पीक पाहणी बदल माहिती. E Pik Pahani App - Krishi News

Friday, 8 July 2022

अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी, जाणून घ्या ई-पीक पाहणी बदल माहिती. E Pik Pahani App

E-Pik-Pahani-App
E Pik Pahani App
    शेतकरी आता स्वत: शेतातल्या पिकांची नोंद E Pik Pahani सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहेत. यासाठी कृषी आणि महसूल विभागानं संयुक्तपणे 'ई-पीक पाहणी' नावाचा उपक्रम हाती घेतला आहे.  
    ई-पीक पाहणी मोबाईल अँप्सच्या (E Pik Pahani App) साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्यास्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. 

    या अँप्स द्वारे आता पर्यंत सुमारे 99 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई- पिक पाहणी E Pik Pahani भ्रमणध्वनी अँप्स द्वारे आपल्या पिकांची नोंदणी केली आहे. सध्या पीक विमा योजना 2022-23 संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे त्यामुळं तुमच्या ७/१२ वर पिकांची नोंद असणे गरजेचं आहे. 


    खरीप हंगामाच्या पीक पाहणीची कार्याहावाही सुरु आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई - पीक पाहणी चे 1.0.0.7 हे मोबाईल आप्सचे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. 

    तरी सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी अँप्सवर करता यावी. यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यानंतर खरीप पिकासाठी नोंदणी करता येणार नाही.

‘ई-पीक पाहणी’ चे असे आहेत फायदे :-

  1.  ‘ई-पीक पाहणी’ (E-Pik Pahni) या अँप्स मुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक.
  2.  या अँप्सवरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे.
  3.  पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.
  4. पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे. 
  5. एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.