Pm Kisan Installment : पीएम किसान योजनेच्या नियमांत मोठे बदल, हे कामे केल्याशिवाय मिळणार नाही पुढील हप्ता.... - Krishi News

Thursday, 30 June 2022

Pm Kisan Installment : पीएम किसान योजनेच्या नियमांत मोठे बदल, हे कामे केल्याशिवाय मिळणार नाही पुढील हप्ता....

    जर तुम्ही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
Pm-Kisan-Installment
Pm Kisan Installment
Pm Kisan Installment : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे मोदी सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करीत असते. देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर काही दिवसांपूर्वीच 11 वा हप्ता वर्ग करण्यात आला आहे. 

    शेतकऱ्यांना आता 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असताना,पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) नोंदणीच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत.या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी मोदी सरकारने हे बदल केले आहेत.याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..


    नवीन नियमांनुसार आता नोंदणीच्या (रजिस्ट्रेशन) दरम्यान राशन कार्डशी संबंधित सर्व माहिती देणे आवश्यक केले आहे. आता तुम्हाला नोंदणी करताना राशन कार्डही अपलोड करावे लागेल. अन्यथा तुम्हाला पुढील हप्त्याची रक्कम मिळणार नाही. (PM Kisan Samman Yojana New Changes In This Scheme, These Documents Compulsory)

    या बरोबरच सरकारने योजनेचे लाभ सुरु राहण्यासाठी ई-केवायसी भरणेही अनिर्वाय केले आहे. वास्तविक सरकारने पीएम किसान सन्मान योजनेत होत असलेल्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी हे बदल केले आहेत. या योजनेत कुटुंबाचा एक सदस्य पती किंवा पत्नीच पैसे घेऊ शकतात. 

हे वाचा :-
    
    सरकारने स्पष्ट केले आहे, की ज्या शेतकऱ्यांजवळ राशन कार्ड आहे, त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in वर जाऊन आपली नोंदणी करु शकतात. 

    या व्यतिरिक्त शेतीचा सातबारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक असणे आवश्यक आहे. या बरोबरच संकेतस्थळावर राशन कार्ड क्रमांकासह मागितलेले कागदपत्रांची साॅफ्ट काॅपी अपलोड करणे ही आवश्यक आहे.

ई-केवायसी आहे आवश्यक

    शेतकऱ्यांना (Farmer) ई-केवायसी करण्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदत दिली गेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांना लाभ मिळालेला नाही. जर तुम्ही ई केवायसी केले नसेल तर लवकरात-लवकर ते करा.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.