अखेर मेघराजा जोरदार कोसळणार...! येत्या पाच दिवसात राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस. monsoon weather - Krishi News

Saturday, 18 June 2022

अखेर मेघराजा जोरदार कोसळणार...! येत्या पाच दिवसात राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस. monsoon weather

    यंदा मान्सून सर्वांशीच लपंडाव खेळत दिसून येत आहे. हवामान विभगाचा (Meteorological Department Forecast) अंदाज देखील पावसाने (Rain) धुडकावून लावला आहे.
monsoon-weather
monsoon weather
    Monsoon Weather :-  महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांतमध्ये अद्यापही पावसाचा ठोस पत्ता नाही. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर (Summer) नागरिक (Citizen) पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तर शेतकरी देखील खरीप हंगामाच्या पेरणीसाठी (Kharif season sowing) पावसाची वाट पाहत आहेत. 

    पाऊस मात्र सर्वांचा चकवा देत आहे. मात्र आता सामान्य नागरिकांची आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळणार आहे. होय, येत्या पाच दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे, अशी हवामान विभागाने वर्तवली आहे.

कसा पडेल पाऊस ?

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, गोव्यात 19 ते 21 जूनदरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात 20 आणि 21 जून रोजी घाटमाथ्यावर काहीशा ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 


    त्याचबरोबर विदर्भात 18 ते 21 जूनदरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्वण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. 
    राज्यात पाऊस चांगला पडला तर शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी देखील फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक चांगलेच बहरणार आहे.

कृषी न्युज आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.