विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा अंदाज. monsoon in india - Krishi News

Tuesday, 14 June 2022

विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा अंदाज. monsoon in india

monsoon-in-india
monsoon in india

    मॉन्सूनची वाटचाल, पूर्वमोसमी पाऊस ( monsoon in india ) यामुळे राज्याच्या तापमानात घट झाली आहे. मॉन्सून Monsoon दाखल झालेल्या भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. आज (ता. १४) विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा monsoon  अंदाज आहे. 


विजांसह पावसाचा इशारा ( येलो अलर्ट ) कुठे 

👇👇👇

👉  इथे क्लिक करा  👈 


    तर कोकणात हलक्या पावसाची monsoon शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. हरियाणापासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरात किनाऱ्यापासून उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. 

    त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रासह, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. निम्म्या महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. 


हेही वाचा :-

    पूर्वमोसमी पावसाच्या monsoon हजेरीने कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या सर्वच भागात कमाल तापमान चाळीशीच्या खाली आले आहे.    सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.९, धुळे ३८.०, कोल्हापूर २९.६, महाबळेश्वर २२.३, नाशिक ३२.३, निफाड ३६.८, सांगली ३२.६, सातारा ३१.२, सोलापूर ३६.२, सांताक्रूझ ३२.९, डहाणू ३४.१, रत्नागिरी ३१.१, औरंगाबाद ३४.४, परभणी ३२.२, अकोला ३५.०, अमरावती ३६.०, बुलडाणा ३७.४, ब्रह्मपुरी ३९.४, चंद्रपूर ३८.०, गोंदिया ३६.६, नागपूर ३६.९, वर्धा ३८.०, यवतमाळ ३६.०.

राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस (monsoon in india) (मि.मी) (स्रोत : हवामान विभाग) :

  • कोकण :- मालवण ७०, दोडामार्ग ४०, अलिबाग, सावंतवाडी प्रत्येकी २०.
  • मराठवाडा :- अंबड ३०, खुलताबाद, बदनापूर, कन्नड, भोकरदन प्रत्येकी २०.
  • विदर्भ :- देऊळगाव राजा, , सिरोंचा प्रत्येकी ३०, लोणार, बुलडाणा प्रत्येकी २०.
  • मध्य महाराष्ट्र :- धुळे, शहादा उद्दिष्ट र प्रत्येकी ४०, दौंड, नांदगाव, सुरगाणा, प्रत्येकी ३०, मालेगाव,सावळीविहीर, सिंधखेडा प्रत्येकी २०.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.