शेतकरी मित्रांनो ‘या’ योजनेसाठी अर्ज करा अन् मिळवा गायी म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान मिळणार. gay gotha anudan yojana - Krishi News

Tuesday, 21 June 2022

शेतकरी मित्रांनो ‘या’ योजनेसाठी अर्ज करा अन् मिळवा गायी म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान मिळणार. gay gotha anudan yojana

    शेती व शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कायम प्रयत्नशील असते. यासाठी त्यांच्या मार्फत विविध योजनांची अंमलबजावणी देखील केली जाते.

gay-gotha-anudan-yojana
gay gotha anudan yojana

    Goverment scheme :-  शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना ( Sharad Pawar Grameen Samrudhi Yojana) यातलीच एक योजना आहे. खेड्यांचा आणि शेतकऱ्यांचा विकास (Farmer Development) व्हावा, ग्रामीण नागरिकांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांसाठी रोजगाराच्या संधी (Employment Opportunity) उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने 2021 मध्ये ही योजना सुरू केली होती.

‘या’ कामांसाठी मिळणार अनुदान :-

    शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2022 साठी शेतकऱ्यांना विविध कामांसाठी अनुदान मिळते. महाराष्ट्रातील नागरिक याचे लाभार्थी होऊ शकतात. कुक्कुट पालन किंवा पोल्ट्री शेड बांधणे, शेळयांसाठी शेड बांधणे, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग, गाई आणि म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे या कामांसाठी लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे Important Documents

    शरद पवार ग्राम समृद्धी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.


अर्ज करण्याची पद्धत :-

    सरकारने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2022 मध्ये अर्ज करण्यासाठी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिली नसून याची माहिती देणारे ऑनलाइन संकेतस्थळ सुद्धा उपलब्ध नाही. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवाराला काही काळ थांबावे लागणार आहे. याची अर्ज प्रक्रिया लवकरच जाहीर होईल.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.