खतांच्या किमती मध्ये झाले मोठे बदल पहा खतांचे नवीन दर तेही मोबाईवर. fertilizer subsidy
शेतकरी मित्रांनो या लेखामध्ये आपण खतांचे भाव Fertilizer Prices पाहणारा 2022 मध्ये खतांचे भाव सरकारने काय जाहीर केलेले आहेत आणि खताच्या दुकानांमध्ये 2022 मध्ये खतांचे (fertilizer) भाव काय आहेत ते आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.
![]() |
fertilizer subsidy |
महाराष्ट्रातील खताच्या किमती :-
खरीप पिकाची लगबग सुरू झालेली आहे. शेतकरी आपली जमीन पिकासाठी तयार करत आहेत. अशा मध्ये शेतकऱ्यांना खताची अत्यंत आवश्यकता असते, कारण खाता शिवाय पीक चांगलं येत नाही किंवा त्याचे उत्पन्न चांगले येत नाही.
त्यामुळे 90 टक्के शेतकरी खत वापरतात. त्याचबरोबर शेतकरी बी-बियाणे कीटकनाशके खरेदी करत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता खताचे भाव fertilizer prices काय किंवा खताचे भाव वाढले आहेत का ? आणि ते किती वाढले, तर अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्याच्या मानत निर्माण झालं असेल.
तरी या लेखामध्ये सर्वच कंपन्यांचे खताचे ( fertilizer ) काय भाव आहे, आणि शेतकरी ते किती भावाने खरेदी करात आहेत. दुकानदार शेतकऱ्यांना किती भावाने खात विकत आहेत याची सविस्तर माहिती बघूया शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर IFFCO च्या माध्यमातून एप्रिलमध्ये खताचे भाव fertilizer prices जाहीर करण्यात आलेले आहेत.
खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची जाणीवपूर्वक कृत्रीम टंचाई निर्माण करून, या खतांची सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.
जिल्ह्यातील खते विक्रेत्यांनी जास्त दराने विक्री करू नये, अशी सूचना कृषी विभागाने सर्व विक्रेत्यांना दिली आहे. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या खते विक्रेत्यांचा विक्री परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करत असतात.
खरिपातील पेरण्यांबरोबरच उसासाठीही रासायनिक खते खरेदी करावी लागत आहेत. यामुळे रासायनिक खतांची वाढती मागणी पाहता, काही विक्रेते हे अधिकाधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करून जास्त दराने विक्री करू लागले आहेत, अशा तक्रारी प्राप्त झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे त्यांनी संगितले.
येथे नोंदवा तक्रार :-
जिल्ह्यातील कोणीही खतविक्रेता निश्चित किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री करत असल्यास, त्याबाबतची तक्रार करण्यासाठी जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. शेतकऱ्यांना या कक्ष च्या ०२० - २५५ ३७७१८ २५५३८३१० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५८४७९३०६ व ९४२३८७४०६ या मोबाइल क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?