शेततळ्यातील मत्स्य पालना बाबत संपुर्ण माहिती || fish farming - Krishi News

Tuesday, 5 April 2022

शेततळ्यातील मत्स्य पालना बाबत संपुर्ण माहिती || fish farming

How to start fish farming || Fish farming business plan  || Fish farming project || Fish farming in india 

fish-farming
fish farming
    अगदी जिरायती क्षेत्रातही २ ते १० गुंठ्यांपर्यंत शेततळ्यामध्ये मत्स्यपालन fish farming केल्यास उत्तम फायदा होऊ शकतो. यशस्वी मत्स्यपालनासाठी काटेकोर नियोजन करावे. त्यासाठी खालील सूत्रे लक्षात ठेवावीत.


    देशातील ६२ टक्के शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षाही कमी, तर १९ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढी शेतजमीन आहे. केवळ शेतीवर कुटुंबाची उपजीविका होण्यामध्ये अडचणी येतात. शेती सोबत पशुपालन, कोंबडीपालन, शेळीपालन, मत्स्यपालन ( fish farming ) यांपैकी शक्य तो जोड धंदा करणे आवश्यक ठरते. 

      महाराष्ट्रामध्ये जिरायती शेतीचे खूप प्रमाण मोठे असून, पाण्याच्या शाश्वततेसाठी शेततळ्यांच्या निर्मितीला राज्य शासनाच्या वतीने "मागेल त्याला शेततळे ही योजना" सुरु करण्यात आली . शेततळ्याचे आकारमान  २.२ ते ९ गुंठे एवढे असते. 

    या तळ्यात १० ते १५ फूट खोल पाणी असते. पिकांच्या संरक्षित पाण्याची सोय त्यातून होते. या पाण्यामध्ये मत्स्यपालन करणेही शक्य आहे.

    मात्र, अनेक शेतकरी केवळ मासे तळ्यामध्ये सोडून याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे फारसा फायदा पदरात पडत नाही. त्याऐवजी काटेकोर पाने नियोजन करून शास्त्रशुद्ध पद्धतीने मत्स्यपालन केल्यामुळे फायदा वाढू शकतो.

Fish Farming करताना घ्यावयाची दक्षता 

१. Silpolin lining व तळे तयार करणे :

 1. शेततळ्यामध्ये पाणी टिकून राहण्यासाठी सिल्पोलीन लायनिंग महत्त्वाचे ठरते. सिल्पोलिनची जाडी किमान ५०० मायक्रॉन असावी.
 2. तळ्याला एका बाजूला उतार असावा, सिल्पोलीन तळाला नीट दाबून बसावी . 
 3.  शेततळ्यात सहज चढउतार करण्यासाठी पायऱ्यांची सोय देखील करावी.
 4. सिल्पोलिनवर शेवाळ धरते. त्यावरून तलावात उतरणे, चढणे कठीण होते. तळ्यास पाणी आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी असलेल्या पाईपला जाळी बसवावी.
 5. तळ्याच्या सर्व बाजूंनी ३ फूट उंचीचे शेडनेटचे कुंपण करावे. ते बांधावर ६ इंचापर्यंत आत रोवावे. म्हणजे बेडूक, साप इत्यादी आत शिरणार नाहीत. पावसाळ्यात शेततळी भरून वाहतात. अशा वेळी तळ्यातील मासे बाहेर जाणार नाहीत, याची संपूर्ण काळजी घ्यावी.

२. Fish Farming पूर्व तयारी :

 1. मासळीचे बीज तलावात सोडण्यापूर्वी उपद्रवी मासे, जाळी मारून तसेच ब्लिचिंग पावडर वापरून काढून टाकावेत. 
 2. बीज सोडण्याच्या ८ दिवस आधी तळ्यात शेणखत ४० किलो, (किंवा कोंबडी खत १८ किलो), युरिया ८ किलो आणि सुपर फॉस्फेट ८ किलो प्रति १० गुंठे या नुसार टाकावे.
 3. पाण्याचा सामू (पीएच) तपासून घ्यावा. पीएच निर्देशाक द्रावणाच्या साह्याने शेतकरीही तो तपासू शकतो. पाण्याचा सामू
 4. ७.० ते ८.२ या दरम्यान असावा. या सर्व खतांमुळे तळ्यात मासळीचे खाद्य (प्लवंग) तयार होते. कटला, रोहू, मृगल, उत्तम. चंदेरा या माशांकरिता हे खाद्य

३. Fish Farming करिता माशांची निवड :

 1. आपल्या हवामानात टिकणारे, जलद गतीने वाढणारे, एकमेकांना त्रास न देणारे व एकमेकांना न खाणारे, तळ्यातील खाद्य आणि कृत्रिम खाद्य सहज स्वीकारणारे आणि बाजारपेठेत चांगली मागणी असणारे मासे पालनाकरिता निवडावे.
 2. माशांची बोटुकली (७ ते १० सेमी लांबी) असतं तळ्यात सोडावी. त्या पेक्षा लहान सोडू नये. 
 3. 3 किंवा 4 जातीच्या माशांचे एकत्रित पालन करण्यासाठी तळ्यातील पाण्याची खोली किमान ३ ते ४ मीटर असावी. 

४. मासळी बीज कसे असावे ?

 1. बहुतांश मत्स्यबीज राज्य शासनाच्या बीजोत्पादन केंद्रातून मिळू शकते. काही चांगल्या खासगी मत्स्यबीजोत्पादन केंद्रातही मिळते. झिंगा, कोळंबीचे बीज पालघर/वसईला मिळते.
 2. बीज निरोगी व चपळ आहेका हे पारखून घ्यावे.
 3. बीजो उतपादन केंद्रातून कमी वेळात बीज तळ्यावर आणावे.  

५. शेततळ्यात माशांचे व्यवस्थापन :

अ) खाद्य व्यवस्थापन :
 1. मत्स्य पालना Fish Farming मध्ये कमी जागेत व ठराविक वेळात मासे वाढवायचे असतात. त्यासाठी माशांना ठरलेल्या वेळी व ठराविक प्रमाणात खाद्य द्यावे. भुईमूग पेंड/सोयाबीन पेंड/सूर्यफूल पेंड यापैकी एक पेंड व भाताची किंवा गव्हाची भुशी हे खाद्य १:१ प्रमाणात मिसळून, रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी छोट्या गोळ्या करून द्यावे. त्याचे प्रमाण तक्ता २ प्रमाणे ठेवावे. तलावाच्या नैसर्गिक उत्पादनाप्रमाणे कमी जास्त करावे.

ब) पाणी व्यवस्थापन :
 1. पिकासाठी ज्या प्रमाणे मातीचा पोत सांभाळणे अतिशय आवश्यक असते, त्याप्रमाणे माशांसाठी पाण्याचा उच्च दर्जा राखावा. पाण्याचा हिरवट रंग शेवाळामुळे न येता सूक्ष्म एकपेशीय वनस्पती मुळे आलेला असावा. पाण्याचा सामू कमी झाल्यास योग्य प्रमाणात चुनखडीचे पाण्याचे द्रावण करून मग टाकू शकतात.

६. माशांचे उत्पादन व अधिक दरासाठी:

 1.  ६ ते ७ महिन्यांत ४०० ते ५०० किलो मासळी प्रति १० गुंठे तळ्यातून मिळेल. सध्याच्या माशांच्या दरानुसार (१५० रुपये किलो) १० गुंठे क्षेत्रातून ७० हजार ते ८० हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
 2. वर उल्लेखलेली मत्स्यपालनाची पद्धत ही कमीत कमी खर्चाची आहे. 
 3. यात कृत्रिम खाद्य किंवा हवेचा पुरवठा करणारी यंत्रे देखील उपयोग करू शकतात. या साध्या पद्धतीनेही शेतकऱ्यांना मासळी उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळू घेऊ शकतात. 
 4. मासळी ताज्या स्थितीत तळ्यावर विकल्यास अधिक प्रमाणत दर मिळू शकतो. 
 5. मासळीचे fillet (काप) करून विकल्यास अजून जास्त प्रमाणत  दर मिळेल. 

Fish Farming करतां  हे टाळा :
 1. लहान आकाराचे बीज (मत्स्य जीरे) तळ्यात सोडू नका.
 2. तळ्यावर बीज आणून देणाऱ्या फिरत्या विक्रेत्याकडून मत्स्य बीज घेऊ नका. फसवणूक होईल. 
 3. सांगितल्या प्रमाणापेक्षा जास्त मत्स्यबीज तलावात सोडू नका. 
 4. आवश्यकतेपेक्षा जास्त खाद्य माशांना देऊ नका. वाया जाईल, शिवाय तळ्याचे पाणी खराब होईल ते वेगळे. 
 5. माशांना दर नसेल, तर तलावातून मासे काढू नका.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.