ई - पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांचे होणार मोठे नुसकान, जाणून घ्या सर्व माहिती || E-Peek Pahani online - Krishi News

Tuesday, 5 April 2022

ई - पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांचे होणार मोठे नुसकान, जाणून घ्या सर्व माहिती || E-Peek Pahani online

E-Peek-Pahani
E-Peek Pahani

E-Peek Pahani न केल्यास शेतकऱ्यांचे होणार मोठे नुसकान

शेती जमीन पडिक समजली जाईल

    ई - पीक (E-Peek-Pahani) पाहणीच्या मोबाईल ॲप्सव्दारे जर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई - पीक पाहणी नोंद केली नाही तर संबंधित शेतकऱ्याच्या शेती मध्ये पीक पेरणी झालेली नाही किंवा त्याचे शेत हे पडीक आहे असे समजल्या जाईल.  ई - पीक पाहणी नोंदीव्दारेच शेतात पीक पेरले असल्याचे मानण्यात येईल. 


pik karj घेण्यासाठी येणार अडचण

    मोबाईल ॲप्सव्दारे  शेतकऱ्याने ई - पीक "E-Peek-Pahani" पाहणीची नोंद न केल्यास संबंधित शेतकऱ्याला पुढील हंगामाकरता कोणत्याही बँकेकडून जर पीक कर्ज घ्यायचे असेल तर पीक कर्ज घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते, कारण बँक सुद्धा संबंधित शेतकऱ्याच्या शेतात पिकाची पेरणी झालेली नसल्याचे गृहीत धरू शकते. 


शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू शकते

    शेतकऱ्यांना आपल्या शेतात पेरलेल्या पिकाची नोंद जर ई - पीक 'E-Peek-Pahani' पाहणी या मोबाईल ॲप्सव्दारे केलेली नसेल तर भविष्यात जर अवकाळी पाऊस किंवा इतर कारणामुळे जी सरकारी आर्थिक मदत शेतकऱ्यांना जाहीर केली जाते.


     त्या प्रकारची सरकारी आर्थिक मदती पासून संबंधित शेतकऱ्याला मुकावे लागू शकते कारण संबंधित शेतकऱ्याच्या शेतात पीकच नाही असे समजले जाईल. 


Pik vima yojanaलाभ मिळणार नाही

    ई - पीक पाहणी ॲप्सव्दारे "E-Peek Pahani app" शेतकऱ्याने आपल्या पेरणी केलेल्या पिकाची नोंद न केल्यास त्या शेतकऱ्याने जरी पीक विमा भरला असेल तरी त्याच्या पिकाचे काही कारणास्तव नुकसान झाले.


     तरी त्याला पीक विम्याचा लाभ मिळणार नाही कारण त्याच्या शेतात पीक पेरणीच झालेली नाही असे ई - पीक E-Peek-Pahani पाहणी ॲप्सव्दारे नोंदणी न केल्यामुळे समजले जाईल. 


वन्यप्राण्यांनी शेतीचे नुसकान केल्यास भरपाई मिळणार नाही

    ई - पीक पाहणीच्या मोबाईल ॲप्सव्दारे ( E-Peek Pahani app ) पिकाची नोंद न केल्यामुळे शेतात पिक पेरणी झालेली नाही असे समजले जाईल. 


     त्यामुळे वन्यप्राण्यांनी शेतीचे नुसकान केल्यास कोणतीही नुसकान भरपाई सरकारकडून संबंधित पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला दिले जाणार नाही. 


    शेतकऱ्याने आपल्या शेतात कोणत्या पिकाची पेरणी केलेली आहे किंवा पेरणी केलेली नाही याची माहिती शासन ई - पीक पाहणी ॲप्सव्दारे E-Peek Pahani app केल्या जाणाऱ्या नोंदणी प्रमाणे ग्राह्य धरणार आहे,


     ई - पीक पाहणी ॲप्सव्दारे आलेली माहितीच विविध शेती संबंधित सरकारी कामासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे. 


आशा प्रकरच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा जॉईन होण्यासाठ  इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.