आता वाहनांसाठी वारस नोंदणी करता येणार || वाहन नोंदणी कायद्यात बदल || vehicle registration rules - Krishi News

Saturday, 5 March 2022

आता वाहनांसाठी वारस नोंदणी करता येणार || वाहन नोंदणी कायद्यात बदल || vehicle registration rules

 
vehicle-registration-rules
vehicle registration rules

वाहनांची नोंदणी करतांनीच आता वाहनासाठीची वारस नोंदणी करता येणार

    वाहनाचा मालकी हक्क हा परिवहन कार्यालयाकडे वाहनांची नोंद करतांनी नोंदविलेल्या नावानुसार मोटर वाहन कायदा 1989 नुसार vehicle registration rules आत्तापर्यंत ठरतो.  वाहन खरेदी केल्यानंतर वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीची कागदपत्रे व वाहनाची कागदपत्रे परिवहन कार्यालयात जमा केल्या नंतर करतांनी परिवहन कार्यालयामध्ये  नोंद घेतल्या जाते.


    परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहन मालकाला वाहनाची आर. सी . बुक देण्यात येते.  आर. सी . बुक वरती वाहनाचा तपशील व वाहन मालकाच्या नावाचा उल्लेख असतो. आतापर्यंत असे होते होते की, संबंधित वाहन मालकाचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्याच्या नावावरती असलेले वाहनाच्या वारस हक्काबाबत अनेक समस्या निर्माण होते होत्या.  


    मृत पावलेल्या व्यक्तीच्या नावावरील वाहनावर अनेक जण हक्क सांगू शकत होते उदा : ' अ' व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात त्याची पत्नी, मोठा मुलगा, लहान मुलगा, मुलगी इत्यादी अनेक जण हक्क सांगू शकतात.  अशा वेळी वाहनाचा मालकी हक्क हस्तांतरणात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. 


     वाहनाचा मालकी हक्क कुणाला द्यायचा याबाबत कायदेशीर प्रश्न निर्माण होत होता. आता मात्र केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून वाहनाच्या मालकी हक्काबाबतच्या मोटर वाहन कायदा "vehicle rules 1989" मध्ये बदल करण्यात येणार आहे.  


    नवीन केल्या जाणाऱ्या बदलानुसार नवीन वाहन खरेदी केल्यानंतर परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी साठी कागदपत्रे सादर करतांनी नॉमिनी अर्ज (vehicle nominee rules) सुद्धा भरता येणार आहे म्हणजेच मूळ वाहन मालकाचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास ते वाहन नंतर कोणाच्या नावाने होणार हे वाहनांची नोंद करताना मूळ मालकाला ठरविता येणार आहे. 


    ज्या प्रमाणे संपत्तीसाठी वारसा नोंदणी केली जाते त्याच प्रमाणे आता वाहनांसाठी सुद्धा वारस नोंदणी ही परिवहन कार्यालयात होणार आहे. 

हा नियम येण्याआधी परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या वाहनाची वारस नोंद कशी होणार 

    जुन्या वाहनांसाठी सुद्धा वारस नोंद हि करता येणार असून वाहन मालकाला ऑनलाइन पद्धतीने अथवा प्रत्यक्ष परिवहन कार्यालयात जाऊन स्वतः ती कागदपत्रे व वाहनाची कागदपत्रे सादर करून नॉमिनी अर्ज भरून भरून देता येणार आहे.  


    नॉमिनी अर्जात वाहनाचा पुढील वारस कोण ठरवायचं याचा अधिकार मूळ मालकाला असणार आहे. आतापर्यन्त वाहनाचा मालकी हक्क हस्तांतरित करतांनी  मालकी हक्काबाबत अनेक अडचणी येत होत्या तसेच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी किचकट प्रक्रिया यासाठी राबवली जात होती.


     आता मात्र संपूर्ण भारतात एकच प्रक्रिया राबवली जाणार असून वारस नोंदणीमुळे सहजासहजी वाहनाच्या मालकी हक्काचे हस्तांतरण करता येणार आहे. 


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.