मातोश्री ग्राम समृद्धी शेती - पाणंद रस्ते योजना || शेतीच्या रस्त्यासाठी १०० % अनुदान || matoshri gram samridhi yojana
matoshri gram samridhi yojana |
मातोश्री ग्राम समृद्धी शेती - पाणंद रस्ते योजना :
२ लाख किलोमीटर किलोमीटर्स रस्ते बांधणार
राज्यातील गावा - गावात शेत रस्ते,पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ' मातोश्री ग्राम समृद्धी शेत रस्ते,पाणंद रस्ते योजना' matoshri gram samridhi yojana राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्धी व्हावेत या दृष्टिकोनातून "मी समृद्ध तर गाव समृद्ध" आणि "गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध" ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
सध्या स्थितीत राज्यात पालकमंत्री शेत,पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करून वा योजनेतील कामासाठी मनरेगा मधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
या यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामासाठी अकुशल व कुशलच्या सहयोगातून शेत - पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेचे नामकरण 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत - पाणंद रस्ते योजना' असे करण्यात आले आहे.
राज्यात शेत रस्ते,पाणंद रस्त्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. रस्त्याअभावी शेतकऱ्यांना तयार पीके बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते . पावसाळ्यातील पिके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी रस्त्याअभावी ती पिकवण्याचा विचार करता येत नाही. पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यात मोठी अडसूळ होता आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला .
तसेच या योजनेच्या उदिष्ठनुसार रोहयो अंतर्गत मागेल त्याला अनुकूल रोजगार उपलब्ध करून देणे व ग्रामीण भागात सामूहिक उत्पादक मत्ता व मूलभूत सुविधा निर्माण करता येणार आहे. या योजनेमुळे सर्व शेतापर्यंत योग्य गुणवत्तेचे बारमाही वापरता येतील असे शेत,पाणंद रस्त्याची गरज आहे.
प्रत्येक गावात सरासरी ५ किलोमीटर्सरच्या शेत,पाणंद रस्त्याची गरज आहे. राज्यात अशा रीतीने राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधता येणार आहेत.
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?