शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती || फेरफार नोंदी बाबत घ्यावयाची दक्षता || फेरफार नोंदी बाबत माहिती || ferfar utara online - Krishi News

Monday, 14 March 2022

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती || फेरफार नोंदी बाबत घ्यावयाची दक्षता || फेरफार नोंदी बाबत माहिती || ferfar utara online

 
ferfar-utara-online
ferfar utara online

फेरफार नोंदीबद्दल दक्षता घेणे आवश्यक

फेरफार नोंदीची पद्धत कशी असते ?

    जमिनीच्या हंक्क बद्दल बाबत तलाठ्याला अर्ज मिळाल्यानंतर अथवा वरिष्ठ महसूल अधिकारी, नोंदणी अधिकारी किंवा न्यायालय यांच्याकडून प्राप्त  झालेल्या "अ"  पत्रकाची नोंद तात्काळ तलाठ्याला फेरफार "ferfar utara"  नोंदवही म्हणजेच गाव नमुना क्रमांक 06 ड वरती घ्यावी लागते.


     त्याची प्रत ई चावडीवर प्रकाशित करणे बंधनकारक आहे.  त्याच्या सोबत पारंपारिक चावडी वरती सुद्धा त्याची ठळक प्रत चिटकवणे बंधनकारक आहे.  त्यासोबतच सर्व संबंधित संबंधितांना नोटीस देणे तलाठ्याला बंधनकारक आहे. 


 वादग्रस्त प्रकरणातल्या नोंदीची  पद्धत :

    मालकी हक्क हस्तांतरणाबाबत फेरफार (ferfar utara)  मध्ये ज्याचा संबंध येत असेल व त्यांना  जर नोंदीवरती हरकत असेल तर ते तोंडी अथवा लेखी स्वरुपात हरकत घेऊ शकतात.  वादग्रस्त नोंदी या वेगवेगळ्या नोंदवहीत ठेवणे तलाठ्याला बंधनकारक आहे.  

    

    तसेच अशा स्वरूपातील प्रत हरकतीस तात्काळ पोच देणे सुद्धा बंधनकारक आहे. वादग्रस्त प्रकरणात म्हणजेच ज्या प्रकरणात हारकत प्राप्त  झाल्या आहे.  अशा प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याने अथवा भूमापन अधिकाऱ्याने सहा महिन्याच्या आत निर्णय घ्यायचा असतो.  वादग्रस्त फेरफारची 'ferfar utara ' नोंद फेरफार वहीत संबंधित नोंदी पुढे दिलेल्या निर्णयाचा उल्लेख करून नोंद कायम अथवा हरकत ग्रस्त असेल तर नोंद रद्द करावयाची असते.


     नोंद प्रमाणित झाल्यानंतरच त्याची  नोंद गाव नमुना क्र 07 म्हणजेच सात-बारा उताऱ्यामधील नमुना 07 वरती घेतली जाते.  नमुना क्र 07 मध्ये आळे करून जुन्या हक्कदारकाच्या नावावर कसं करून नवीन हक्क धारकाचे नाव हक्क तपशिलासह नोंदवले जाते. 


फेरफार नोंदीबाबत कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे :

    तलाठ्यास गाव नमुना क्रमांक 06  ड वरती वरती हक्क नोंद घेण्याशिवाय कोणताही इतर अधिकार नाही.  फेरफार ferfar utara  नोंदवहीत वरती नोंद करणेही प्राथमिक सुरुवात आहे.  सदर फेरफार नोंदवहीत नोंद घेतल्याची नोटीस गावच्या चावडीवर व आता नवीन स्वरूपातील ई चावडीवर लावणे महसूल कायदा कलम 150 (2) नुसार आवश्यक करण्यात आलेले आहे. 


     सदर फेरफार नोंदी मंडळ अधिकाऱ्याकडून तपासल्या जातात.  मंडळ अधिकारी त्यासंबंधीचे सदर केलेले दस्त व विविध आदेशांची खात्री करून घेतात.  आवश्यकता  भासल्यास चौकशी सुद्धा करतात.  महसूल अभिलेख नोंदवह्या सुस्थितील ठेवणे ही जबाबदारी नियमावली 1971 मधील नियम क्रमांक 5(3) नुसार मंडळ अधिकार्‍यांची असते. 


    फेरफार ferfar utara नोंदवहीतील नोंदीत कोणतीही खाडाखोड ग्राह्य धरली जात नाही तरीसुद्धा खाडाखोड झाल्यास मंडळ अधिकारी खाडाखोडबाबत सही करून प्रमाणित करतो.  असे मंडळ आधिकऱ्याला करणे महसूल नियमावली नियम क्रमांक 5(5) नुसार आवश्यक आहे. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.