किसान क्रेडिट कार्डवर पशुधन मिळणार || पीक कर्जा शिवाय मिळणार १ लाख ६० हजारांचे बिनव्याजी कर्ज || kisan credit card
![]() |
kisan credit card |
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड kisan credit card वर पीक कर्जा शिवाय १ लाख ६० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. हे कर्ज फक्त दुधाळ पशुधन खरेदीसह, शेळी, मेंढी, कुकुट आणि मत्स्य पालनासाठी दिला जाणारा आहे.
या साठी शेतकऱ्यांनी फक्त एक पानी अर्ज करावं लागणार आहे आणि अर्ज हा तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे करावयाचा आहे. अर्जदार शेतकऱ्यानं, हे कर्ज पशुपालनासाठी उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.
डॉ. परकाळे म्हणाले, "केंद्र सरकारच्या धोरणानुसार आता कुकुट पालन ,शेळी पालन, मेंढी पालन, मत्स्यपालनासाठी पीक कर्जा प्रमाणे कर्ज उपलब्ध होणार आहे. हे कर्ज किसान क्रेडिट कार्डद्वारे (kisan credit card ) उपलब्ध होणार असून, कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार एवढी असणार आहे.
हे वाचा 👇👇👇👇👇
या कर्जासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ७ / १२ उताऱ्यासह, वैयक्तीक माहिती, कुटुंबाची माहिती, पशुधनाची संख्या इत्यादी माहितीचा एक पानी अर्ज हा पंचायत समिती मधील तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे सादर करावं लागणार आहे.
जास्तीत जास्त शेतकरी, पशुपालकांना या योजनेचा लाभ मिळण्साठी हे अर्ज पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत संबंधित बँकांना सादर केले जाणार आहे. यानंतर बँकेमार्फत पतपुरवठा केला जाणार आहे.
"या योजनेमुळे शेतकरी, पशु पालकांना ५० आणि ७५ टक्के अनुदानाच्या योजनेसाठी प्राथमिक भाग भांडवल किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणार असून, १०० टक्के सवलतीमध्ये पशुपालन व्यवसाय सुरू करणे शक्य होणार असल्याचेही डॉ. परकाळे यांनी संगितले.
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?