शेतजमीन खरेदी करताय ? मग या गोष्टी तपासूनच खरेदी करा || कागदपत्रे || कायदे || shet jamin kharedi kayda

shet-jamin-kharedi-kayda
shet jamin kharedi kayda

 शेतजमीन खरेदी करतां या गोष्टी तपासूनच खरेदी करा

    महाराष्ट्र राज्यात शेतजमीन खरेदी shet jamin kharedi करण्यासाठी व विकण्यासाठी काहि नियम वेगळे आहे.

    महाराष्ट्र राज्यात शेतजमीन विकायची shet jamin vikri असल्यास खरेदी करणारा शेतकरी असेल तरच ती विकता येते. विकत घेणारा शेतकरी नसेल व तो शेतमजूर असेल तरी सुध्दा शेतजमीन विकता येते.

    शेतजमीन कुळकायद्याच्या अंतर्गत येत असेल अश्या वेळी 32 ग तसेच 84 क या कायद्यातील तरतुदीनुसार नोंदी कमी करून योग्य अधिकार असलेल्या महसूल अधिकाऱ्याची परवाणगी मिळवून खरेदी विक्रीचे व्यवहार करणे गरजेचे असते.

    कुळकायद्याच्या कक्षेत असलेली जमीन विमुक्त भटक्या जाती किंवा अनुसूचित जाती पैकी असेल तर योग्य अधिकार असलेल्या महसूल अधिकात्याची खरेदी विक्रीची परवानगी घेणे आवश्यक असते, त्यासोबतच 7/12 उताऱ्यावरील “नवीन शर्त" असा शेरा असेल तर तो शेरा कमी करणे अतिशय गरजेचे असते.

    ज्या शेतजमिनीचा व्यवहार करावयाचा आहे त्या शेतजमिनीच्या 7/12 उताऱ्यावर कुळाचे नाव लागलेले असेल तर अशी जमीन विकत घेऊ नये.

    जी शेतजमिन विकत घ्यायची आहे ती शेतजमिन प्रत्यक्ष कोण कसत आहे ते पहावे, शेतजमिन मालकाशिवाय इतर कुणी कसत असेल तर कसणाऱ्याकडे शेतजमिन कसण्याचा ताबा कशा प्रकारचा आहे तो पहावा.

    शेतजमीन विकत घेण्याआधी संबधीत शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावर असलेल्या इतर हक्काच्या नोंदी में ध्ये बोज्याच्या नोंदी पहाव्यात, त्यामंध्ये राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था, तसेच वाहन कर्ज, गृह कर्ज, व्ययक्तिक कर्ज यासाठी शेतजमीन तारण ठेवलेली आहे का या नोंदी पहाव्यात, असल्यास त्या नोंदी कमी केल्याशिवाय व्यवहार करू नये.

    शेतजमीनीचा एकुण जमीनीचा दाखला म्हणजेच 8 अ उताऱ्यावरती विक्री करणाऱ्या शेतमालकाचेच नाव नमुद आहे का याची खात्री करायला हवी.

    जी शेतजमीन खरेदी करावयाची आहे त्या शेतजमीनीच्या चतुःसीमा तपासुन पहायला हव्यात.

    शेतजमीनीला असलेल्या रस्त्याची नोंद तपासून पहायला हवी, खरेदीखतावर वहिवाटीच्या रस्त्याचा उल्लेख अवश्य करून घ्यायला हवा.

    शेतजमीनीत असलेली विहीर, कुंपनलिका, जणावरांचा गोठा, शेड, शेतघर (फार्म हाऊस), बांध, शेततळे, पाईपलाईन, झाडे यांच्यावरती शेतजमीन मालकाखेरीज इतरांचे अधिकार ( उदा. विहीरीतील हिंस्सा) आहेत का हे तपासून घ्यावे.

    “फार्म हाऊस" बनवण्यासाठी शेतजमीन खरेदी करावयाची असल्यास तिचे क्षेत्र एक एकर व त्यापेक्षा जास्त असावे अन्यथा एक एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेली शेतजमीनीवरती “फार्म हाऊस” बांधता येत नाही.

    संबधीत शेतजमीनीसाठी बाहेरील स्त्रोताव्दारे पाणिपुरवठा होत असेल तर त्या बाबतीतला हंक्क तपासून घ्यावा. तोंडी अथवा लेखी हस्तांतरणाचा करार झालेला असल्यास अशी शेतजमीन खरेदी करणे टाळावे, जमीनीच्या हस्तांतरणाची योग्य नोंदणी आधी झालेली असल्या खेरीज अश्या शेतजमीन खरेदीचा व्यवहार करू नये.

    खबरदारी म्हणून शेतजमीन मालकाडून शेतजमीन खरेदीपुर्वी संबधीत शेतजमीनीबाबत कोर्ट प्रकरणे, हस्तांतरण कैरार व इतर काहि बोजे निर्माण झालेले नाहित याबाबत अॅफिडेव्हिट केलेले प्रतिज्ञापत्र लिहुन घ्यावे.

    शेतजमीनीच्या 7/12 उता-यावरती पोटखराब शेतजमीनीचा उल्लेख स्वतंत्र असतो खरेदी करतांनी सुध्दा पोटखराब शेतजमीनीचा उल्लेख करावा.

    ज्या शेतजमीनीचा खरेदी व्यवहार करावयाचा आहे त्या शेतजमीनीचे मागील 30 वर्षांपर्यंन्तचे 7/12 उतारे तपासून घ्यावे व संबधीत शेतजमीनीची मालकी कशी – कशी हस्तांतरीत होत गेली ते पहावे, तसेच उपनिबंधक कार्यालयात संबधीत शेतजमीनीचे मागील 30 वर्षां पर्यन्तचे नोंदणीकृत व्यवहार तपासावेत.

    खरेदी करावयाची शेतजमीन शहरी क्षेत्रात येत असेल अश्या वेळी त्या शेतजमीनीबाबत इतर अनेक बाबी तपासाव्या लागतात त्यात महानगरपालीका, नगरपालीका, नगरपरिषद अंतर्गत असलेल्या शेतजमीनीच्या संदर्भातील कायद्यांचा समावेश होतो.

    उपनिबंधक कार्यालयामंध्ये शेतजमीनीचे खरेदीखत बनण्याआधी संबधीत शेतजमीनीची सरकारी किंमत किती आहे हे तपासून पहावे कारण सरकारी किंमतीवरतीच शेतजमीन व्यवहाराचा मुद्रांक शुल्क भरावे लागते.

    शेतजमीनीची प्रत्यक्ष खरीदी करण्याआधी त्या शेतजमीनीच्या सौद्याची साक्षीदारा समवेत इसार इसार पावती करायला हवी.

    ज्या शेतजमीनीची विक्री केल्या जाणार आहे त्या शेतजमीनीचा मालक ती शेतजमीन का विकत आहे याचे कारण जाणून घेणे सुध्दा आवश्यक आहे.

    7/12 उतारा हा शेतजमीन मालकीचा अंतीम दस्तऐवज नसतो, मालकी ज्या दस्तऐवजाने शेतजमीन मालकास मिळाली ते सर्व दस्तऐवज तपासायला हवेत, व त्या दस्तऐवजांच्या सर्व मूळ प्रती शेतजमीन खरेदीखताबरोबरच खरेदीदाराने आधीच्या मालकाकडून घ्यायला हव्यात.

Comments

Popular posts from this blog

५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme

land survey map online : गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन तेही मोबाईल वरून .

५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana