शेत जमिनीवरील अतिक्रमण, बांध कोरणे, जमिनीवरील कब्जा || कायद्याव्दारे असे काढा अतिक्रमण || shet jaminiivaril atikraman kase kadhave - Krishi News

Friday, 31 December 2021

शेत जमिनीवरील अतिक्रमण, बांध कोरणे, जमिनीवरील कब्जा || कायद्याव्दारे असे काढा अतिक्रमण || shet jaminiivaril atikraman kase kadhave

shet-jaminiivaril-atikraman-kase-kadhave
shet jaminiivaril atikraman kase kadhave

Shet Jaminiivaril Atikraman काढण्याबाबत माहिती 

     शेतजमिनीवरील अतिक्रमण (shet jaminiivaril atikraman) करून ताबा घेणे या गोष्टी कायम ग्रामीण भागात सुरु असतात, यातून मोठ्या प्रमाणवर विवाद देखील निर्माण होतात. 

    शेतजमिनीवरील  केलेले अतिक्रमण प्रत्य्क्ष मालकाच्या आर्थिक बाबीवरती गदा आणण्यासारखेच आहे, खाजगी जागेवर झालेले अतिक्रमण "atikraman " कसे काढावे व ते काढण्यासाठी कोणती कायदेशीर कारवाई करावी लागते.

    याबाबत माहिती असणे अतिक्रमण किंवा कब्जा झालेल्या जमीन मालकानं आवश्यक आहे.  

शेत जमिनीवरील अतिक्रमण म्हणजे काय 

 • खाजगी मालकीच्या शेत जमिनीवरील अतिक्रमण 'shet jaminiivaril atikraman' यामध्ये बांध कोरून किंवा संपूर्ण शेतजमिनीवर अवैधरित्या प्रत्यक्ष ताबा मिळविलेला असतो. 
 • स्वतः च्या मालकीच्या जागेला लागून असलेल्या दुसऱ्याच्या जागेच्या हद्दीत बांधकाम करणे, किंवा दुसऱ्याच्या मालकीच्या संपूर्ण जागेवरच बांधकाम करणे. 
 • शेत जमीन हि स्वतः चीच आहे आशय प्रकारची परिस्थिती निर्माण करून दुसऱ्याचा मालकी हक्क असलेली शेत जमिनीवर कब्जा "shet jaminivar kabja"  करणे. 
 • सार्वजनिक उपयोगाचे कारण दाखवून जागामालकाची परवानगी न घेता जागेवरती कब्जा  करणे.  उदा : संस्कृतीक कार्यक्रमासाठी, व्यायाम करण्यासाठी, वारंवार जागेचा विनापरवानगी उपयोग करून नंतर सदर जागेवर कब्जा करणे. 
 • धार्मिक काम, पुतळा बसविणे, झाड लावणे, अवैध स्मारक उभारणे इत्यादी कारणासाठी जागा मालकाची परवाणगी न घेता परस्पर जागेच कब्जा करणे. 

Shet Jaminiivaril Atikraman करून ताबा मिळविण्याची करणे 

 • जमिनीचा मूळ मालक हा जमीन आहे. त्या ठिकाणी राहत नसेल आशय वेळी संबधितांच्या जागेवरती अवैध कब्जा इतरांकडून घेण्याची शक्यता असते. 
 • जमिनीला कंपाऊंन्ड नसणे, शेतजमीन असल्यास शेतजमिनीच्या बांधांवर खुणा नसणे यामुळे अतिक्रमणास पोषक परिस्थिती तयार होते. 
 • जमिनीचे भाव प्रचंड वाढलेले असल्यामुळे जाणीपूर्वक आशय जमिनीवर अविधरित्या कब्जा मिळवून अतिक्रमण केल्या जाते व वाद निर्माण केल्या जातो त्यानंतर वाद मिटविण्यासाठी व जमिनीचं कब्जा सोडण्यासाठी पैश्याची मागणी किंवा जमिनीचा काही भाग मागितला जातो. 

शेत जमिनीवरील अतिक्रमणाबाबत महत्वाची माहिती 

 • जमिनीवरील अतिक्रमण 'Jaminiivaril Atikraman' काढण्याची जबाबदारी हि प्रत्यक्ष जमीन मालकाचीच असते. 
 • खाजगी मालकी असलेला जमीनधारक आपल्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमण बाबत तक्रार तहसील कार्यलयाकडे करतो मात्र खाजगी मालकीच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत निर्णय देण्याचं अथवा कार्यवाही करण्याचं अधिकारी तहसिदार यांच्या अधिकारक्षेत येत नाही. 
 • मूळ जमीन मालक बाहेरगावी राहत असल्याने बऱ्याचदा १५ वर्षेनंतर आपल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे त्याला कळते, त्यानंतर संबंधित जमीन मालक तहसील कार्यलय, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत  कार्यलय यांच्याकडे अतिक्रमण काढून देण्याबाबत दाद मागतो मात्र संबधित कार्यलयाकडून अतिक्रमण काढून देण्यात येत नाही कारण १५ वर्ष पर्यंत अतिक्रमण Atikraman काढण्यासाठी संबंधित जमीन मालकाकडून कोणतंही तक्रर न आल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीचा वहिवाटीचं हक्क लागण्यासाठीची परिस्थिती निर्माण होते. 
 • खाजगी मालकीच्या जागेवर अतिक्रमण झालेले असल्यास लवकरात लवकर त्याबाबत तक्रर करणे आवश्यक असते, तक्रर हि पोलीस स्टेशन किंवा कोर्ट मध्ये दावा दाखल करून करता येत. 

Shet Jaminiivaril Atikraman बाबत पोलीस स्टेशनची भूमिका 

      अतिक्रमण केलेल्या जागेबाबत पोलीस स्टेशन मध्ये तक्रर केल्यानंतर पोलिसनमार्फत अतिक्रमण त्वरित दूर करण्यात येईल अशी आशा मुळ जमीन मालकाला असते, मात्र असे होत नाही कारण सदर बाब हि दिवाणी गुन्ह्यांशी संबधित येत असून अतिक्रमण खरच  झालेले आहे का हे सिध्द करणे अतिशय आवश्यक असते, अतिक्रमण झाल्याबाबत नकाशा व पुरावा पाहून कारवाई करण्याचं अधिकार पोलिसांना दिलेला नाही. 

शेत जमिनीवरील अतिक्रमण कश्या प्रकारे काढावे ? 

       खाजगी मालकीची जागा त्यात शेत जमीन असो  यामध्ये झालेले अतिक्रमण काढण्यासाठीची प्रक्रिया हि वेळखावू आहे त्यासाठी खूप वेळ  लागू शकतो. 

      अतिक्रमण हा विषय दिवाणी गुन्ह्यांशी संबधित येत असल्या कारणाने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो, न्यायालयीन प्रक्रिया हि वेळखावू असल्याने अतिक्रमण धारकाच अतिक्रमण जागेवरील ताबा असण्याचा कालावधी हा वाढत जातो,
  
 अतिक्रमण किंवा कब्जा काढण्यासाठी खालील पर्याय वापरता येतात . 

 • आपल्या खाजगी मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण (Jaminiivaril Atikraman) झाले आहे असे लक्षात येताच त्या अतिक्रमणावरती आक्षेप नोंदविल्या गेला पाहिजे, काही वेळा अतिक्रमणा बाबद दुर्लक्ष केल्या जाते व १५ वर्ष व त्यापेक्ष जास्त कालावधी झाल्यनंतर संबधित अतिक्रमण विरुध्द तक्रार दिल्या जाते मात्र आशा प्रकरणात न्याय मिळण्याची शक्यता हि फार कमी प्रमाणत असते. 
 • अतिक्रमण संदर्भात आक्षेप नोंदवित असताना बऱ्याचदा तहसील कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर करण्यात येतो मात्र तसे न करता पोलीस स्टेशन मध्ये अतिक्रमण संदर्भात तक्रर अर्ज सादर करणे आवश्यक असते. 
 • पोलीस स्टेशन मध्ये संबधित अतिक्रमणाची तक्रर नोंदवून घेतली जात नसेल किंवा पोलीस स्टेशन मध्ये घावयाची नसेल आशय वेळी कोर्टा मध्ये दिवाणी दावा वकिलामार्फत दाखल करणे आवश्यक असते. 
 • संबधित ठिकाणी तक्रर हि पुरवयनीशी लिखित स्वरूपात करावी तसेच तक्रर अर्जची दुय्य्म परत तक्रर नोंदणी क्रमांकासह आपल्या जवळ तक्रर केल्याचा पुरावा म्हणून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात न्याय मिळविण्यासाठी त्याच उपयोग होतो. 

अतिक्रमण व तालुका भूमि अभलेख कार्यालय 

       तालुका भूमि अभलेख  कार्यालयात तालुक्यातील संपूर्ण जमिनीचे नकाशे हे हंदीसह  उपलब्ध असतात. त्या नकाशानुसार सरकारी जमीन मोजणीची प्रक्रिया हि होत असते, 

जमीन मोजणी "Jamin Mojani" ची प्रक्रिया हि खालील प्रमाणे होते. 
 • जमीन धारकांमध्ये जमिनीच्या ताब्यावरून जेव्हा वाद निर्माण होतात आशय वेळी वादग्रत जमिनीची मोजणी Jamin Mojani हि  भूमि अभलेख कार्यालयाकडून करून मिळते यासाठी भूमि अभलेख  कार्यालयाकडे जमीन मोजणीच्या फी सह मोजणी करून देण्याबाबत अर्ज सादर करावा लागतो. 
 • भूमि अभलेख कार्यालयातील सरकारी मोजणी मध्ये तातडीची मोजणी व साधी मोजणी असे प्रकार आहेत. तातडीच्या मोजणीसाठी मोजणी फी हि अतिरिक्त आकारल्या जाते.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.