पाईपलाईन व पाटाचा हंक्क || दुसऱ्याच्या शेतातुन पाईपलाईन व पाट आणन्याचा कायदेशीर हंक्क || pipeline baddal kayde - Krishi News

Monday, 20 December 2021

पाईपलाईन व पाटाचा हंक्क || दुसऱ्याच्या शेतातुन पाईपलाईन व पाट आणन्याचा कायदेशीर हंक्क || pipeline baddal kayde

pipeline-baddal-kayde
pipeline baddal kayde

 pipeline चे हक्क 

       जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी अतिशय कष्ट करीत असतो. शक्य आहे, तेथून पाण्यासाठी पाईप लाईन टाकून जमीन बागायत करण्याकडे शेतकऱ्याचं खूप कला असतो. पाईपलाईन "pipeline" मुळे आता लांबच्या ठिकाणावरून पाणी आणणे शक्य झाले आहे. आशय परिस्थितीत दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातून पाईपलाईन न्यावी लागते व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाद देखील निर्माण होताना आपण पाहतो.  

      पूर्वीच्या जाळी बहुसंख्य शेतकऱ्याचे पाण्याचे पाट किंवा पाईपलाईन (pipeline) हि विहिरीपासून प्रत्यक्ष शेतापर्यंत, मुख्यतः स्वतःच्या शेतातून जात असत. पाणी पुरवठयाच्या मर्यदित साधनांमुळे, पाण्याच्या कमी उपलब्ध ते मुळे व शेजमिनीचे तुकडे झाल्यामुळे आता दुसऱ्याच्या शेतातून देखील पाण्याचे पाट किंवा पाईपलाईन काढावी लागते.

       जर शेतकर्यांमध्ये सामंजस्य असेल आणि पाट कढण्यास किंवा पाईपलाईन 'pipeline ' कढण्यास कोणाचीही हरकत नसेल तर वाद निर्माण होत नाहीत व आशा प्रकरणी कोणत्याही परवानगीची देखील गारच उद्धवत नाही. तथापि दुसरा शेतकरी पाण्याचं पाट काढू देत नसेल किंवा पाईपलाईन जाऊ देत नसेल तर वाद निर्माण होऊ शकतो. 


pipeline baddal kayde :

      या संदर्भत, महारष्ट्र जमीन महसूल कर्यलाअंतर्गत महारष्ट्र जमीन महसूल (पाण्याचे पाट बंधने किंवा पाईपलाईन) नियम १९६७ हे बनविण्यात आले आहेत. या नियमानुसार ज्या शेतकऱ्याला दुसऱ्याच्या जमिनीतून जाणारे आपल्या शेतापर्यंत पाट बांधण्याची इच्छा असेल किंवा पाईपलाईन pipeline करावयाची असेल त्याने विहित नमुन्यामध्ये तहसीलदारकडे अर्ज केला पाहिजे. 

       आस अर्ज मिळाल्यानंतर तहसीलदार सर्व संबधितांना नोटीस काढून त्यानं आपले म्हणणे मांडण्याची संधी देतात. कोणत्या मुद्धवर शेजारच्या शेतकऱ्याची हरकत आहे हे तपासले जाते व गरज विचारात घेऊन अर्जदाराला पाण्याचे पाट बांधण्यासाठी किंवा पाईपलाईन करण्याची परवानगी दिली जाते. 

अशी परवानगी देतांना तहसीलदारकडून खालील महत्त्वाचे मुद्धे विचारात घेतले जातात.  


 • एकवाक्यता न झाल्यास शेजारच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल आशा पद्धतीने पाट काढण्यास किंवा पाईपलाईन करण्यास परवानगी दिली जाते. 
 • पाईपलाईन टाकतांना दुसऱ्या शेतकऱ्याचे नुकसान जाणीवपूर्वक केले जात नाही ना याची देखील खात्री केली जाते. 
 • पाण्याच्या पाटाची रुंदी हि किमान आवश्यक एवढीच असेल व कोणत्याही बाबतीत दिड मीटरपेक्ष जास्त असू नये. 
 • pipeline अर्ध्या मीटरपेक्षा जास्त खोलीवर टाकली पाहिजे
 • जमिनीवरून करण्यांत येणारे पाण्याचे पाट व जमिनीवरून जर पापलाईन टाकण्यांत आली तर शेजारच्या शेतकऱ्यास वाजवी म्हणून ठरविण्यांत येईल ते भाडे दिले जाते. 
 • पापलाईन टाकतांना तसेच तिची दुरुस्ती करतांना कमीत कमी जमीन खोदली जाईल व खोदलेली जमीन अर्जदाराने पुन्हा स्वखर्चाने पूर्ववत केली पाहिजे. 
 • उभी पिके असतील तर त्यानं कमीत कमी नुकसान पोहोचेल याची दक्षता घेतली जाते. एवढे करूनही नुकसान झाल्यास तिची नुकसान भरपाई अर्जदाराने देणे अपेक्षित आहे. 
 • अशी नुकसान भरपाई देण्यात जर कसूर करण्यांत आली तर ती जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुम करता येईल.  


pipeline बदल अपिल :

      pipeline बाबत तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध कोणत्याही अपिल करता येत नाही. लहान लहान वाद हे स्थनिक पातळीवर सुटावेत व अपिलांच्याद्वारे संबधीताला पाईपलाईन सारखी महत्त्वाची बाब लांबविण्याची संधी मिळू नये हा यामागील उद्देश आहे. 

     तथापि अन्यायाने आपल्यावर आदेश बाजवण्यांत आले आहेत. असे वाटल्यास जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागत येईल व जिल्हाधिकारी आशा प्रकरणाची कागदपत्रे मागवून व सुनावणी घेऊन योग्ये ते आदेश काढू शकतील. 

pipeline अर्जाचा नमुना :

         शेतकऱ्याने खालील विहित नमुन्यात तहसीलदारकडे अर्ज केला पाहिजे व अर्जसोबत पाईपलाईनचा किंवा पाटाचा नकाशा व 7/12 चा उतार पाहिजे. 

नमुना :

   महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 याचे कलम 49, पोट-कलम (1) अन्व्ये पाण्याचा पाट बांधण्यासाठी किंवा पाईपलाईन करण्यासाठी तहसीलदारकडे करावयाचा अर्ज.

तहसीलदार :                                   यांस,

अर्जदाराचे संपूर्ण नावं :  

वय :                   व्यवसाय : 

पत्ता  :

मी खालील जमिनीचा धारक आहे :

गावाचे नावं  -  भूमापन नंबर  -  की पोट-हिस्सा नंबर  -  की क्षेत्रफळ  -  आकारणी  -  जमीन मालकाचे नावं 

वर उल्लेखिलेल्या माझ्या जमिनीच्या जलसिंचनासाठी पाण्याच्या पुढील साधनातून पाणी घेण्याचा माल हक्क आहे :

( येथे पाण्याच्या साधनांचा तपशील ध्यावा )

हे पाणी घेण्यसाठी, शेजारचे जमीनधारक असणारे ... ... यांच्या तब्यतील किंवा .. ... ..  यांच्या मालकीच्या पुढील जमिनीमधून पाण्याचा पाट बांधणे आवश्यक आहे. 

गावाचे नावं  -  भूमापन नंबर  -  की पोट-हिस्सा नंबर  -  की क्षेत्रफळ  -  आकारणी  -  जमीन मालकाचे नावं 

माझ्या जमिनीचा शेतीसाठी पूर्ण पाने उपयोग करण्यासाठी पाण्याचा pipeline करणे आवश्यक आहे. जमिनीसंबंधीचे अधिकार अभिलेखीत उतारे जोडले आहेत. म्हणून, मी विनंती करतो कि, उक्त मणिनीमधून पाण्याचं पाट बांधण्यासाठी माल परवानगी देण्याबद्दल शेजारच्या जमीनधारकास निर्देश देण्यात यावा. 

                                                 आपला,      

दिनांक :-    /    /                   अर्जदाराची सही. 


टीप : नदीच्या पत्राचा भाग असणाऱ्या जमिनीच्या बाबतीत अधिकार अभिलेखातील उतारे जोडण्याची आवश्यकता असणार नाही. 

हे लक्षात ठेवा :

 • आस्तित्वात असलेले पाण्याचे पाट किंवा pipeline कोणी मोडून टाकल्यास किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यास किंवा त्यास नुकसान पोहोचवण्याचं प्रयत्न केल्यास संबंधित शेतकऱ्याने तहसूलदारकडे दाद मागीतली पाहिजे. 
 • मामलेदार कोर्ट ऍक्टनुसार असा अडथळा आणण्यास मनाई केली जाऊ शकते. 
 • जमीन महसूल कायद्यनुसार कलम 49(10) नुसार आशा प्रत्येक नुकसानीच्या प्रसंगाबाबत प्रत्येकवेळी १०० रुपयाहून अधिक नसेल एवढा दंड संबधीताना केला जाऊ शकतो. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.