शेत जमीन नावावर करण्यासाठी आता लागणार फक्त शंभर रुपया || land transfer done using only 100 rupess - Krishi News

Sunday, 12 December 2021

शेत जमीन नावावर करण्यासाठी आता लागणार फक्त शंभर रुपया || land transfer done using only 100 rupess

land-transfer-done-using-only-100-rupess
land transfer done using only 100 rupess

जमीन हस्तांतरणासाठी लागणार फक्त १०० रुपये 

        महाराष्ट्रात "महारष्ट्र महसूल आभिनियम 85" नुसार "land transfer" म्हणजेच जमीन हस्तांतरणा प्रक्रिया होय, एका कुटूंबातील रक्ताच्या नात्यांमध्ये म्हणजेच वडिलांकडून मुलाकडे अथवा  वडिलांकडून मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क हा भरावा लागत होता, मात्र आता या रक्ताच्या नात्यात जमीन हस्तांतरण करत असतांनी आता मुद्रांक शुल्क भरण्यासाठी आवश्यकता राहणार नाही, 

        आता फक्त १०० रुपयाच्या स्टँम्प पेपरवरती जमीन हस्तांतरणचे 'land transfer' वाटणीपत्र आता करता येणार आहे, त्यासाठी शासनकडून या आधी एक परिपत्रक सुध्दा काढण्यात आलेले होते, त्या परिपत्रकानुसार तहसीलदारांना महाराष्ट्र अधिनियम 85 नुसार वाटणीपत्र करण्याचे निर्देश दिलेले आहे, त्यामुळे हिंदू कुटूंब पद्धतीनुसार एकाच कुटूंबातील रक्ताच्या नात्यामध्ये जमीन हस्तांतरण करण्यासाठी याचा लाभ निश्चितच होणार आहे. 

       या पूर्वी जमीन हस्तांतरणाचे (land transfer) अधिकार तहसीलदारांना होते, त्यानतंर महसूल अधिनियमामध्ये काही बदल करण्यात आले होते तसेच शासनाचा महसूल बुडू नये या साठी नव्याने आदेश पारित करण्यात आले होते, त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार कटुंबामध्ये रक्ताच्या नात्यात वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली  होती.  

       याचा फटका बहुतांशी सर्वसामन्य शेतकऱ्यांना बसत होता, त्यामुळे वडिलांची अथवा आईची जमीन मुलांच्या अथवा मुलीच्या नावावर करण्यासाठीही मुद्रांक शुल्क भरावा लागत होता, यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत. शासनातर्फ तहसीलदारांना कुटूंबातील रक्ताच्या नात्यामध्ये जमीन हस्तांतरणाबाबत land transfer  स्पष्ट आदेश देण्यास यवत, अशी मागणी प्रामुख्याने महाराष्टातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत होती 

land transfer act:

       त्यामुळे महाराष्ट शासनातर्फ स्पष्ट आदेश या आधीच  काढण्यात आले असून हिंदू कुटूंब पद्धतीनुसार वडिलांची अथवा आईची जमीन त्यांच्या मुलामध्ये वाटणी पत्र करत असताना तसेच गट विभाजन करत असताना महाराष्ट महसूल अधिनियम 85 नुसार तहसीलदारांना आधिकार असून त्याची त्यांच्या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवरती हे आधिकृत वाटणीपत्र आणि गट विभाजन करून देण्यास कसलीच हरकत नसल्याचे निदर्शनास शासनातर्फ आणून दिले आहे. 

      त्यामुळे महाराष्ट महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणारी कुटूंबातील रक्तच्या नात्यातील जमीन हस्तांतरणाची (land transfer) प्रकरणे तात्कळ निकाली काढावीत, आशा सूचनाही शासनातर्फ महाराष्ट्रतिल तहसीलदारांना या पूर्वीच दिलेल्या आहेत. 

       आता नवीण आदेशनव्ये एकाच कुटूंबातील रक्तयाच्या नात्यात जमीन हस्तांतरण करायचे असेल अथवा गट विभाजन करून घ्यायचे असेल तर त्यासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची वेळ जमिनीचे विभाजन करणाऱ्यांवर येणार नाही, तर आता फक्त केवळ शंभर रूपाच्या स्टँप पेपर वरती रक्ताच्या नात्यात जमीन विभाजन होणार आहे. 
 

शेतकऱ्यानं होणार खालील फायदे

  •  रक्ताच्या नात्यात जमीन विभाजन करणे सोपे.
  •  कुटूंबामध्ये रक्ताच्या नात्यात जमीन हस्तांतरणासाठी नाहक आर्थिक भुर्दड आता लागणार  नाही. 
  • फक्त १०० रुपयात रक्ताच्या नात्यात विभाजन अथवा गट विभाजन करता  येणार.
  •  कुटूंब विभक्त झाल्यनंतर जमीन वाटणीसाठी लागणार खर्च कमी होणार. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.