हक्कसोडपत्रा म्हणजे काय || हक्कसोडपत्राचा कायदा || वडीलोपार्जीत संपत्तीबाबत हक्कसोडपत्र || hakka sod patra - Krishi News

Wednesday, 29 December 2021

हक्कसोडपत्रा म्हणजे काय || हक्कसोडपत्राचा कायदा || वडीलोपार्जीत संपत्तीबाबत हक्कसोडपत्र || hakka sod patra

hakka-sod-patra
hakka sod patra

hakka sod patra म्हणजे काय ?

    एकत्र कुटूंबातील कोणत्याही एका सदस्याने म्हणजेच सहहिस्सेदाराने त्याच्या स्वतः च्या वैयक्तिक हिश्याच्या मिळकतीवरील हक्क जाणून बुजून कायमस्वरूपी कायदेशीर दृष्ट्या सोडून देणे म्हणजेच हक्कसोडपत्र (hakka sod patra) होय. 

      उदा : एकत्र कुटूंबातील X,Y,Z तीन व्यक्ती असून यापैकी Z या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक हिश्याच्या मिळकतीवरील हक्क सोडून देऊन तो X व Y याना हक्क दिला. 

hakka sod patra कोण करू शकते ?

     हक्कसोडपत्र हे एकत्र कुटूंबातील कोणताही सदस्य किंवा सहहिस्सेदारा मग तो महिला असो किंवा पुरुष हे हक्कसोडपत्र "hakka sod patra" तयार करू शकतो

hakka sod patra हे कोणत्या मालमतेचे करता येते ? 

    वारसाहक्काने किंवा वारसाधिकाराने एखाद्या व्यक्तीस मिळालेली मिळकत अथवा मिळू शकणार आहे. अशी एकत्र कुटूंबातील त्याच्या हिश्याच्या मिळकतीच्या संबधात हक्कसोडपत्र तयार करता येते. 

     उदा : रवींद्र, प्रसाद, सुमित्रा हे तिघे भाऊ व बहिन असून त्याच्या वडिलांची वडिलोपार्जित सहा एकर शेती असून सुमित्रा हिच्या हिश्याला येणाऱ्या वडिलोपार्जित  दोन एकर हिश्यावरील हक्क सुमित्रा आपल्या दोघं भावांसाठी सोडू शकते. घर, शेती, व इतर स्थनावर मालमतेसंदर्भत सुध्दा हक्क सोडपत्र 'hakka sod patra' करता येते. 

hakka sod patra हे कोणच्या लाभत करता येते ?

    हक्कसोडपत्र हे फक्त एकाच कुटूंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदाराच्या लाभात तयार करत येते. कुटूंबातील सहहिस्सेदार नसलेल्या सदस्यांच्या लाभात अथवा कुटूंबाबाहेरील सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्र hakka sod patra तयार करता येत नाही, 

    तसे करावयाचे असल्यास हक्कसोडपत्र ग्राह्य होत नसून मिळकतीचे ह्स्तांतरण समजले जाते व मुबई मुदांक कायदा 1958 नुसार मिळकतीच्या मूल्यांकनावर खरेदीखताप्रमाणे मुदांक शुल्क देखील भरावा लागतो. 

hakka sod patra साठी कुटूंबातील सदस्याला मोबदला घेता येतो का ?

     सर्वसाधारणपणे हक्कसोडपत्र  हे कुठलाही मोबदला न घेता असते मात्र सदस्याला मोबदला हवा असेल तर मोबदला घेवून सुध्दा हक्कसोडपत्र hakka sod patra करून घेऊ शकतो. 

hakka sod patra साठी मुद्रांक शुल्क भरावे लागते का ?

    हक्कसोडपत्र हे कुटूंबातील सहहिस्सेदाराच्या लाभताच केले जात असल्याकारणाने त्यावर मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही मात्र हक्कसोडपत्रा (hakka sod patra) साठी नोंदणी करणे आवश्यक असल्याने नोंदणी शुल्क २०० रुपयाचं मुद्रांक व नोंदणी फी भरावी लागते. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.