शेत जमीनीचे अंत्यन्त महत्वाची कागदपत्रे |खरेदीच दस्त, मृत्युपत्र, हक्कसोड पत्र, फेरफार उतारे, जमिनिचा नकाशा आणि गहाण खत | पहा सर्व कागदपत्रे || - Krishi News

Saturday, 11 December 2021

शेत जमीनीचे अंत्यन्त महत्वाची कागदपत्रे |खरेदीच दस्त, मृत्युपत्र, हक्कसोड पत्र, फेरफार उतारे, जमिनिचा नकाशा आणि गहाण खत | पहा सर्व कागदपत्रे ||

     ग्रामीण भागातील शेतकऱ्यानं शेती विषयक महत्वाच्या कागदपत्रे व त्याबाबतीतले कायदे याबाबत माहिती कमी प्रमाणत असलेली दिसून येते, जमिनीचे विविध कागदपत्रे तसेच विविध जमिनी विषयक कायद्यांचे ज्ञान नसल्यामुळे शेतकऱ्यानं बऱ्याच ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो. 

जमीनीचे-महत्वाची-कागदपत्रे
जमीनीचे महत्वाची कागदपत्रे 

      विविध न्यायालयात आज आपल्याला शेती विषयक खटल्याचें प्रमाण मोठया प्रमाणवर असलेले दिसून येते, न्यायालयात सुद्ध विविध खटल्याच्या अनुषंगाने शेती बाबतीतल्या कागदपत्रांची आवश्यकता असते. तसेच विविध शेती आधारित सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्ध कागदपत्रांची आवश्यकत पडते, ऐनवेळी कागदपत्रे एकत्र सापडत नाही किंवा ती आपल्याकडे नसतात, 

      त्यामुळे बऱ्याचदा कागदपत्र नसल्यमुळे पात्र असून सुद्ध कोणत्याही सरकारी योजनाच लाभ घेऊ शकता नाही. शेतकऱयांनी आपल्या शेत जमिनीचे कागदपत्रे म्हणजेच विविध रेकॉर्ड आपल्या स्वतः कडे जतन करून ठेवणे खूप आवश्यक आहे, शेतकऱ्यांनी दोन फाईल्स बनवून एका फाईल्स  मध्ये ओरिजनल मणजेच कागदपत्राच्या मूळ प्रति ठेवायल्या हव्यात व दुसऱ्या फाईल मध्ये झेरॉक्स केलेल्या प्रति ठेवायल्या हव्यात. 

जमीनीचे महत्वाची कागदपत्रे -

खरेदीच दस्त (kharedi khat):

     जमिनी खरेदीचा दस्त यालाच रजिष्ट्री असे सुध म्हणतो, जमीन खरेदी नंतर दस्त नोंदणी विभागात जमीन हस्तांतरची नोंद केली जाते व केलेल्या नोंदीची एक प्रत संबंधित खरेदीदाराला दिली जाते.

    ती  रजिष्ट्रीची परत हि खूप महत्वाची असून सात- बार उताऱ्यावर नाव लावण्यासाठी म्हणजेच फेरफार करण्यासाठी अर्ज करताना रजिष्ट्रीची पर सॊबत जोडणे आवश्यक असते. रजिष्ट्री बरोबर सूची नंबर दोन त्यालाच index II सुद्धा म्हणतात त्याची सुद्धा पावती जतन करून ठेवणे आवश्यक आहे.  

मृत्युपत्र (mrutyupatra):

       मृत्युपत्राद्वारे जमिनीचे हस्तांतरण झालेले असेल आशय बेली मृत्यूवत्राची नोंद करून त्याबाबतीतले नोंदणी दस्त जतन करून ठेवायला हवे, बऱ्याचदा मालकी हक्कावरून वाद निर्माण होतात अश्यावेळी मालकी हक्क सिध्द करण्यासाठी मृत्यूपत्राची आवश्यकता कायदेशीर प्रक्रियते आवश्यक आहे. 

वारस हक्काने (varas hakka pramanpatra):

      वारस हक्काने वडिलोपार्जित जमीनची मालकी मिळालेली असल्यास, एका कागदवरती संपूर्ण वनशवेळेची नोंद करून ठेवायला हवी, यामध्ये आजोबांच्या वडिलचे नाव, आजोबाचे नाव, त्यांना असलेली मुले व मुली, व त्यांच्या मृत्यू पश्चात मालकी हक्कात झालेला बदल व वारसाच्या नोंदी अशी संपूर्ण माहिती लिहलेली असावी.

        वारस हक्काने मिळालेला जमिनीचं हिस्सा व त्याप्रमाणे एकूण किती जमिनी पैकी किती जमिनीचे क्षेत्र आपल्या नावावरती झाले यांची सुध्दा नोंद करायला हवी या बरोबर वारस ठरावाचे उतारे व फेरफार नोंदीचे उतारे सुध्दा जतन करायला हवे.  

हक्कसोड पत्र (hakka sod patra):

       वडिलोपार्जित संपत्तीत कुटूंबाच्या एखादा सदस्याला वाटा नको असेल अश्यावेळी हक्कसोड पत्र करून त्याचा हक्क सोडवून घेता येतो, केलेल्या हक्कसोड पत्राची परत व नोंदणीची परत सुद्धा जतन करून ठेवायला हवी,

       वडिलोपार्जित संपत्तीत मुलीचा सुध्दा मुलां इतकाच हक्क असतो, मात्र बऱ्याचदा मुली आपल्या भावासाठी हक्कसोड पत्र करून आपला वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क सोडून देतात. काही वेळ मालकी हक्कावरून वाद निर्माण झाल्यास हक्कसोड पत्राची प्रत मालकी हक्क सिध्द करण्यासाठी आवश्यक ठरतो. 

फेरफार उतारे (ferfar utara):

     वारसा हक्क, बक्षीसपत्र, खरेदी, दान इ. कोणत्याही पद्दतीने जमिनीचे हस्तांतरण झालेले असेल आश्या वेळी, सात - बार उताऱ्यावरती नाव लावण्यासाठी फेरफार करणे आवश्यक असते, शक्य असल्यास फेरफार करण्यासाठी केलेल्या आर्जच्या रिसिव्हड प्रत जतन करून ठेवाव्यात तसेच, फेरफार उतारे सुध्दा जतन करून ठेवावे. 

7 / 12 उतारा (7/12 utara ):

         नमुना नंबर सात व नमुना नंबर बार मिळून 7/12 उतारा बनतो, नमुना नंबर 7 हा मालकी हक्कसंदर्भात माहिती दर्शवतो तर नमुना नंबर 12 हा पिकाची नोंदणी दर्शवतो. जमिनीचे विविध प्रकरचे हस्तांतरण झाल्यानंतर फेरफार करावा लागतो त्यानंतर सात - बार उताऱ्यावरती संबधिताचे नाव लागते,जुन्या सात - बार उताऱ्यासह नविन सात - बार उताऱ्याची परत हि जतन करून ठेवायला हवी, 

      आपल्या मालकी हक्कची नोंद दरवर्षी योग्य पद्दतीने झाली कि नाही हे पाहण्यासाठी सात - बार उतारा खूप महत्वाचं ठरतो, जमिनीवर मालकी मिळल्यानंतर सर्व सात - बार उतारे फाइलमध्ये जतन करून ठेवायला हवे पुढील पिढीला सुध्दा आपला हक्क माहिती होण्यासाठी मोठी मदत यातून मिळ्ते.

8 अ उतारा (8 a utara) :

       विविध गट किंवा सर्वे मधील आपल्या नावावरती एकूण किती जमिनीचे क्षेत्र आहे हे 8 अ उताऱ्यातून आपल्याला कळते, विविध प्रकरचे जमीन हस्तांतरीत झाल्यनंतर व  फेरफार प्रक्रिया पूर्ण होऊन सात - बार उताऱ्यावर नाव लागल्यानंतर अध्यवात 8 अ उताऱ्याची प्रत काढून जतन करून ठेवायला हवी. 

      या बरोबर प्रत्येक वर्षी शेतसारा भरल्यानंतर सुध्दा नवीन प्रत जतन करून ठेवायला हवी. वडिलोपार्जित जमीन असेल अश्यावेळी वेळ वडिलाच्या नावावर किती जमीन होती व आज तुमच्या नावावर किती जमीन आहे हे सिद्ध करणारे दोन्ही 8 अ उतारे फाइल मध्ये जतन करून ठेवायला हवे. 

जमिनिचा नकाशा (jaminicha nakasha):

      जमिनीचे निश्चित ठिकाण सिद्ध करणारे महत्वाचे कागदपत्र म्हणजे जमिनीचा नकाशा, नकाशात जमिनीच्या चतुर : सीमेचा उल्लेख केलेला असतो, तलाठी कर्यालयाकडून किंवा भूमी अभिलेख कर्यालयाकडून मिळविलेला जमिनीचा नकाशा सुध्दा जतन करून ठेवायला हवा. 

जमीन मोजणीची कागदपत्रे (jamin mojani documents) :

        बऱ्याचदा जमिनीचे ताब्यात असलेले क्षेत्र हे प्रत्यक्ष नावावरती असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी - अधिक असते, अश्या वेळी तालुका भूमी अभिलेख कर्यालयाकडून जमिनीची शासकीय मोजणी करून घेता येते, जमिनीची शासकीय मोजणी झाल्यनंतर भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीचा नकाशा व अहवाल दिल्या जातो, असा नकाशा व अहवाल हा सुध्दा जतन करून ठेवायला हवा. 

गहाण खत (gahan khat):

        बऱ्याचदा जमीन हि गहाण ठेवली जाते अश्यावेळी गहाण खत बनवून घेतल्या होते, गहाण खत करून जमीन गहाण ठेवलेली असेल आशय वेळी गहाण खताची प्रत सुध्दा फाईल मध्ये जतन करून ठेवायला हवी, जेणे करून पुढे गहाण खत रद्द करताना किंवा गहाण खत सोडून घेतानी अथवा कायदेशीर समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी त्या प्रतीची आवश्यकता पडू शकते. 

बोजा (boja patram):

        बंककडून कर्ज घेताना जमिनीवर बोजा चढवला जातो व बोज्याची नोंद सात - बार उताऱ्यावर केली जाते, आशय वेळी कर्जाचं बोजा "ई " करारपत्राच्या आधारे करण्यात येतो.  "ई " करारपत्राच्या नमुन्याची पावती सुध्दा जतन करून ठेवायला हवी.

कराराच्या प्रति (kararache prakar):

         जमीन संदर्भातील भाडे करार तसेच जमिनी संदर्भात आणखी इतर विविध करार केले जातात, जसे कि "कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग " असे विविध प्रकारचे करार जर आपण जमीन बाबत केलेले असतील तर त्या कराराच्या पावत्या सुद्धा जतन करून ठेवायला हव्यात.

ना हरकत प्रमाणपत्र (noc certificate):

       बँकेकडून विविध करणासाठी कर्ज घेतल्यानंतर सात - बार उताऱ्यावर बोजा चढविला जातो. कराज ची परत फेड केल्यानंतर संबधित बँकेकडून "NOC" घ्याल हवी. हे प्रमाणपत्र मिळविणे खूप आवश्यक असते त्याशिवाय 7 / 12 उताऱ्यावरून कर्जचा बोजा उतरणे शक्य होत नाही. यासाठी "ना हरकत प्रमाणपत्र" ची पावती बॅंकांकडून मिळल्यानंतर जतन करून ठेवाल हवी.   

जमीन महसूल भरल्याच्या पावत्या :

      प्रत्येक वर्षी जमिनीचं महसूल हा भराव लागतो , जमीन महसूल भरल्यानंतर तलाठया मार्फत महसूल भरल्याबाबतची पावती दिली जाते, हि पावती कायद्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची असून एक पुरावा म्हणून महसूल भरल्याची पावती हि जतन करून ठेव्याला हवी. 

     आश्या प्रकारे वरील जमिनी संदर्भातील विविध कागदपत्रे जपून ठेवल्यास शेतकऱ्यानं किँवा जमीन मालकाला व त्याच्या कुटूंबाला आपल्या जमिनीबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल तसेच तात्काळ आहि कागदपत्रांची आवश्यकता बसल्यास धावपळ होणार नाही आज सुध्दा अनेक शेतकऱ्यानं जीव जमीन मालकानं आपल्या जमिनी बाबत आवश्यक असणारी संपूर्ण नाही, तरी सर्वंनी आपल्या जमिनीचे विविध कागदपत्रे संकलित करून एका फाइलमध्ये जतन करून ठेव्याला हवी. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.